Health : आपले चांगले आरोग्य हे आपण काय खातो यावर देखील अवलंबून असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मटण-चिकन-मासे हे खाल्याने आपल्या आवश्यक ती पोषणतत्त्वे, प्रथिने आपल्या शरीराला मिळतात, पण जे शाकाहारी खवय्ये आहेत. त्यांना पर्याय म्हणून आम्ही अशा एका फळाबद्दल सांगणार आहोत. जे खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणि याची चव चाखाल तर मटण-मच्छी विसराल.. कोणते आहे ते फळ जाणून घ्या...


 


अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण हे फळ.. फायदे माहित आहेत का?


आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असणारे हे फळ दुसरे तिसरे कोणतेही नसून फणस (Jackfruit) आहे. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा फणस तुम्ही विविध प्रकारे खाऊ शकता. यासोबतच तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का? पोषणतज्ज्ञांच्या मते फणस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. फणस ही एक हंगामी भाजी आहे. जी सहसा उन्हाळ्यात मिळते. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे केवळ भाजीची चवच वाढवत नाहीत. उलट ते आपल्या शरीराला पोषक तत्वे देखील पुरवतात. त्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.


 


जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतील..


एका वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालय लोहिया येथील बीएएमएस आयुष वैद्यकीय अधिकारी मंजू वर्मा यांनी सांगितले की, तुम्ही विविध पदार्थांमध्ये फणसाचा वापर करू शकता. कारण, त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यासोबतच यामध्ये रिबोफ्लेविन, थायमिन, पोटॅशियम कार्बन, मॅग्नेशियम, मँगनीज आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळतात. 


 


कर्करोगाचा धोका कमी करते, तरुणपणा राखते..


तज्ज्ञांच्या मते. फणसामध्ये विविध प्रकारची फायटोन्यूट्रिएंट्स फणसात आढळतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यात हायपरटेन्सिव्ह, अँटी-कॅन्सर आणि अँटी-अल्सरसोबतच वृद्धत्वविरोधी घटकही असतात. याच्या सेवनामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखल्या जातात. या सोबतच पोटाचा अल्सर होण्यापासून देखील हे बचाव करते.


 


हृदयरोगी, मधुमेहींसाठी उपयुक्त


वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फणसामध्ये वेगवेगळे पोषक तत्त्वे आहेत. जे आपली पचनसंस्था निरोगी ठेवते. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. यासोबतच हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठीही हे फायदेशीर मानले जाते. त्वचेची समस्या असेल तर त्यातही ते फायदेशीर आहे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health : भर उन्हातून आल्यानंतर तुम्हीही लगेच थंड पाणी पिताय? आताच थांबा! शरीरावर होणारे परिणाम जाणून थक्क व्हाल