Health : कधी कधी माणूस इतका गाढ झोपतो की त्यावेळी तो किती जोरात घोरतोय हे त्याला कळत नाही. झोपताना घोरणे ही अनेकांची सवय असते, पण झोपताना त्यांना याची जाणीव नसते. मात्र त्याच्या जवळ राहणाऱ्या लोकांना घोरण्याच्या आवाजामुळे त्रास होऊ शकतो. माणसाच्या घोरण्याच्या सवयीची अनेकजण खिल्ली उडवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की घोरण्यामुळे तुमच्या आरोग्याला किती नुकसान होते? बरेच लोक घोरणे ही एक सामान्य सवय मानतात आणि जे लोक घोरतात ते गाढ झोपलेले असतात. मात्र, या सवयीचे अनेक तोटेही असू शकतात.
घोरण्याची कारणं काय आहेत?
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, झोपताना घोरण्याची अनेक कारणे असू शकतात. जेव्हा तुमच्या श्वासोच्छवासाच्या नळ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा घोरण्याची समस्या उद्भवते, झोपताना जेव्हा हवा श्वासनलिकेच्या माध्यमातून आत आणि बाहेर जाते. तेव्हा कंपन निर्माण होते. हा अडथळा तुमच्या अनुनासिक नलिकांमध्ये कफ किंवा घाण जमा झाल्यामुळे असू शकतो. याशिवाय घोरणे हे विविध आरोग्याच्या समस्यांचे लक्षण असू शकते आणि त्याचे अनेक दुष्परिणामही होऊ शकतात. जाणून घेऊया घोरण्यामुळे होणाऱ्या काही हानी.
घोरण्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते?
झोपेचा त्रास
घोरणे तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते. याचा झोपेवर परिणाम होतो आणि झोपेची कमतरता देखील होऊ शकते.
थकलेले असणे
पुरेशी झोप न मिळाल्याने तुम्हाला दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि उर्जेची कमतरता जाणवू शकते. यामुळे तुम्हाला कामाच्या दरम्यानही आळशीपणा वाटू शकतो आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.
हृदयरोगाचा धोका
जास्त घोरणे आणि स्लीप एपनियामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. यामुळे उच्च रक्त प्रवाह, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
मानसिक आरोग्यावर परिणाम
नियमित घोरणे आणि झोपेची कमतरता मेंदूच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते. हे स्मरणशक्ती, लक्ष आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित करू शकते.
हेही वाचा>>>
मंडळींनो.. दिवसभर AC मध्ये राहणं पडू शकतं महागात! एसी रूममधून बाहेर पडताच शरीराचे काय नुकसान होते? तज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )