Health : पावसाळा हा आल्हाददायक वातावरण तर घेऊन येतोच..सोबत विविध आजारही आपलं डोकं वर काढतात, आरोग्य तज्ज्ञांच्या मते पावसाळ्याचे हवामान जीवजंतूंसाठी पोषक असल्याने जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. जसे की डेंग्यू, मलेरिया इत्यादी.. डेंग्यू हा एक असा गंभीर आजार आहे, जो पावसाळ्यात बहुतेक लोकांना बळी पाडतो. हा डासांमुळे होणारा आजार असून जो कधीकधी गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण बनतो. हा रोग एडिस डासांच्या माध्यमातून पसरतो, ज्यामुळे पीडित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवरही गंभीर परिणाम होतो. सविस्तर माहिती जाणून घ्या..
डेंग्यूचा परिणाम आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर कशाप्रकारे होतो?
मान्सूनचे आगमन होताच अनेक आजार आणि संसर्ग लोकांना आपले बळी बनवू लागतात. या कालावधीत, अन्न, पाणी आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. डेंग्यू हा त्यापैकी एक आजार आहे, जो या ऋतूमध्ये झपाट्याने पसरतो. गेल्या काही काळापासून देशाच्या विविध भागातून सातत्याने डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. हा डासांमुळे होणारा सर्वात सामान्य रोग आहे, जो कधीकधी गंभीर प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत हे रोखण्यासाठी सर्व महत्त्वाच्या गोष्टींची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. डेंग्यूचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. एवढेच नाही तर त्याचा परिणाम आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेवरही होतो. डेंग्यूचा मेंदू आणि मज्जासंस्थेवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. विनित बंगा यांनी याबाबत माहिती दिलीय..
डेंग्यू म्हणजे काय?
डेंग्यू ताप हा डासांमुळे पसरणारा रोग आहे, जो उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. सामान्य डेंग्यूमुळे तापासारखी लक्षणे दिसतात. मात्र डेंग्यू तापाचा गंभीर प्रकार, ज्याला डेंग्यू हेमोरेजिक फ्लू असेही म्हणतात, गंभीर रक्तस्त्राव, रक्तदाब अचानक कमी होणे, ज्यामुळे मृत्यूची संभावना, हा रोग साधारणत: एडिस डासांद्वारे पसरतो.
मेंदू आणि मज्जासंस्थेवर डेंग्यूचा परिणाम कसा होतो?
डॉक्टर म्हणतात की, डेंग्यूच्या विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस डासांद्वारे पसरतो आणि मुख्यतः व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो. याचा पीडित व्यक्तीवर महत्त्वपूर्ण न्यूरोलॉजिकल प्रभाव देखील असू शकतो. डेंग्यू पीडित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर अनेक प्रकारे परिणाम करू शकतो. एन्सेफलायटीस, मेंदूला सूज हा त्याच्या सर्वात गंभीर परिणामांपैकी एक आहे. यामुळे, रुग्णांना तीव्र डोकेदुखी, तीव्र ताप, फेफरे येणे, मानसिक स्थिती बदलणे आणि अगदी कोमा यांसारखी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय, डेंग्यूमुळे मेंदुज्वर देखील होऊ शकतो, ज्यामुळे मान ताठ होणे, फोटोफोबिया आणि तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
मज्जासंस्थेवर डेंग्यूचा प्रभाव
डेंग्यूमुळे होणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये एन्सेफॅलोमायलिटिस (एडीईएम) यांचा समावेश होतो, ज्यामुळे गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) देखील होऊ शकते, ही अशी स्थिती असते, जिथे रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि लकवा होऊ शकतो.
हेही वाचा>>>
Employee Health : 21 ते 30 वयोगटातील कर्मचाऱ्यांना कामाचा सर्वाधिक ताण, तर पुरुषांपेक्षा महिला जास्त तणावग्रस्त, सर्वेक्षणातून माहिती समोर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )