Fungal Infection : पावसाळ्यात (Monsoon) त्वचेसंबंधित (Skin Care) अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा (Fungal Infection) धोका जास्त असतो. ओल्या आणि दमट वातावरणामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो. पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य संसर्गाची समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय (Home Remedies) करू शकता. अशाच काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.


बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection)
पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे बुरशी निर्माण करणारे जंतू (Bacteria) वेगानं पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात फंगल इंफेक्शन अधिक प्रमाणात होते. मात्र योग्य काळजी घेतल्यास यातून सुटका होऊ शकते.


कडुलिंब (Neem)
बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे बुरशीजन्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून उकळवून त्या पाण्याने अंघोळ केल्यास यापूसन सुटका मिळेल.


टी ट्री ऑइल (Tea Tree Oil)
पावसाळ्यात होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गाच्या समस्या कमी करण्यासाठी संसर्ग झालेल्या भागावर टी ट्री ऑइल लावा. याच्या मदतीने तुमचा संसर्ग लवकरात लवकर बरा होईल.


हळद (Tumeric)
फंगल इन्फेक्शनच्या समस्यांवर हळदीची पेस्ट लावल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल.


खोबरेल तेल (Coconut Oil)
खोबरेल तेल वापरल्याने फंगल इन्फेक्शनची समस्या कमी होऊ शकते. खोबरेल तेलामुळे सूज आणि लालसरपणापासून आराम मिळतो. 


कोरफड (Aloevera or Aloevera Gel)
संसर्ग झालेल्या भागावर कोरफड लावल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल. कोरफड ऐवजी ऐलोवेरा जेलही वापरता येईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :