Benefits Of Pink Salt : सध्याच्या व्यस्त जीवनात अनेकांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळतं. यामध्ये उच्च रक्तदाब (Blood Pressure), मधुमेह (Diabetes) अशा आजाराचा समावेश होतो. आजकाल रक्तदाब आणि मधुमेह हा आजार बहुतेकांना झाल्याचं पाहायला मिळतं. या आजारांमुळे ह्रदयासंबंधित आजारांचा धोका संभवतो. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांना मीठाचे (Salt) सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही आहारात साध्या मिठाऐवजी सैंधव मीठाचा (Pink Salt) म्हणजेच हिमालयीन मिठाचा (Himalayan Salt / Rock Salt) वापर करा. यामुळे बीपी नियंत्रणात राहील.


सैंधव मिठाचा वापर जास्त करून उपवासावेळी केला जातो. हे मीठ शुद्ध मानले जाते. कोणत्याही केमिकल प्रक्रियेशिवाय हे मी तयार केले जाते. तर साधे मीठ तयार करताना त्यावर अनेक केमिकल प्रक्रिया केल्या जातात. यामुळे साध्या मीठातील पोषकतत्वे कमी होतात. यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात सैंधव मिठाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.


सैंधव मिठाचे फायदे
1. सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
2. या मिठात कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. याचा आरोग्याला फायदा होतो.
3. लवकर थकवा आणि अशक्तपणा जाणवणाऱ्या व्यक्तींनी फक्त सैंधव मिठाचे सेवन करावे.
4. सैंधव मीठ उच्च रक्तदाब कमी करून शरीराला आराम देण्यास मदत करते.
5. हे मीठ डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. याचं सेवन केल्यानं दृष्टी चांगली राहते.
6. सैंधव मीठ खाल्ल्यानं पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.
7. जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळण्याची समस्या असेल तर तुम्ही लिंबाच्या रसात सैंधव मीठ मिसळून खाऊ शकता.
8. सैंधव मिठाचे सेवन केल्याने मसल क्रॅम्पची समस्या दूर होते आणि झोप चांगली येते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :