Joints And Bones Pain : साधेंदुखीची (Joint Pain) समस्या आजकाल फक्त वृद्ध व्यक्तींनाच नाही तर कमी वयाच्या व्यक्तींनाही उद्भवते. या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे संधिवात होऊ शकते. संधिवात हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. पावसाळ्यामध्ये सांधेदुखी अधिक सतावते. आहार आणि जीवनशैली ही सांधेदुखीची प्रमुख कारणं आहेत. या शिवाय खुर्ची आणि संगणकासमोर तासनतास बसणे, यामुळे ही समस्या उद्भवते. सांधेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे.
आयुर्वेदात सांगितलं आहे की, शरीरात वात वाढल्याने सांधेदुखी किंवा संधिवात होतो. शरीरात हवा जास्त असेल तर हाडांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे सांधे दुखीची समस्या वाढते. अशावेळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात हा सांधेदुखी अधिक त्रासदायक ठरते. थंड वातावरणामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात आणि त्या भागातील रक्ताचे तापमान कमी होते. त्यामुळे सांधे आकुंचन पावून अधिक वेदना होतात.
सांधेदुखीपासून सुटका कधी मिळवाल?
1. आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश करा.
सकाळचा सूर्यप्रकाश जरूर घ्या. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल. सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीमुळे पाठदुखी आणि सांधेदुखी दूर होण्यास मदत होईल.
2. योग्य सकस आहार घ्या
नेहमी पौष्टिक अन्न खावं. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी जड अन्न खाऊ नये. त्यामुळे शरीरातील हवा वाढते. चणे, राजमा, तांदूळ, कोबी आणि सोयाबीन यांचं सेवन टाळावं.
3. थंड वस्तूपासून दूर राहा
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर थंड अन्नपदार्थ तुमच्यासाठी हानिकारक ठरतात. विशेषतः फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न, थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स पिऊ नका. यामुळे सांधेदुखीचा त्रास अधिक वाढू शकतो.
4. पुरेशी झोप घ्या
ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी रात्री उशिरापर्यंत जागू नये. जास्त वेळ जागे राहिल्याने शरीरातील वात वाढतो. यामुळे सांधेदुखी वाढते. योग्य दिनचर्या पाळत आरोग्याची काळजी घ्या.
5. योगा करा
काही लोक सांधेदुखीमुळे कठीण व्यायाम करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही योगाच्या मदतीने सांधेदुखी समस्येवर मात करू शकता. गिधासन आणि प्राणायाम यांसारखी अनेक आसने आहेत, जी नियमित केल्याने तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळेल. याशिवाय चालण्याची सवय ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :