Liver Damage : मानवी शरीर एक यंत्र आहे. शरीरात अनेक अवयव असून शरीराचं कार्य सुरळीत चालसाठी सर्व अवयव काम करतात. सर्व अवयवांमध्येच लिव्हर (Healthy Liver) हादेखील एक महत्त्वाचा अवयव. लिव्हर (Liver Damage) अन्नपचन, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचंही काम लिव्हर करतं. अशा परिस्थितीत जर लिव्हरचं काम बिघडलं तर मात्र शरीराला मोठी किंमत चुकवावी लागते. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य उत्तम राहणं अत्यंत गरजेचं असतं. अनेकदा आपल्या आहारातील काही चुका लिव्हर डॅमेजसाठी कारणीभूत ठरू शकतात. जर हे लिव्हर डॅमेज साधं असेल तर उपचारांच्या मदतीनं अगदी आठवड्याभरात किंवा महिन्याभरात रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो. 


लिव्हर डॅमेज झाल्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत लिव्हरला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. यामध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी, अल्कोहोलचं अति सेवन आणि व्हिटॅमिन बी 3 चे ओव्हरडोज यांचा समावेश आहे. 


व्हिटॅमिन बी 3 म्हणजे काय? (Benefits Of Vitamin B3)


शरीराद्वारे अन्नाचं ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी व्हिटॅमिन B3 अत्यंत फायदेशीर ठरतं. ते आपल्या शरीराद्वारे अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी बनवलं जातं आणि वापरलं जातं. याशिवाय मज्जासंस्था, पचनसंस्था आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते.


दररोज किती प्रमाणात B3 आवश्यक आहे?


हार्वर्ड युनिवर्सिटीच्या अहवालानुसार, 19 पेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना 16mg आणि महिलांना 14mg B3 दररोज आवश्यक आहे. तसेच, गर्भवती महिलांना 18 मिलीग्राम आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना 17 मिलीग्राम व्हिटॅमिन बी3 ची आवश्यकता असते.


B3 ओव्हरडोज होण्याची शक्यता कधी?


B3 चं नैसर्गिक स्रोत जसं की, यीस्ट, दूध, मांस, टॉर्टिला आणि धान्य हे तपासा की, शरीरातील B3 चं प्रमाण कधीही गरजेपेक्षा जास्त होणार नाही. पण जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला न घेता व्हिटॅमिन बी3 चे सप्लिमेंट घेत असाल, तर ओव्हरडोज होण्याची शक्यता वाढते.


शरीरात व्हिटॅमिन बी3 वाढलंय हे कसं ओळखावं, त्याची लक्षणं काय? 



  • चक्कर येणं

  • त्वचेवर लाल चट्टे येणं

  • हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणं

  • खाज

  • मळमळ आणि उलट्या होणं 

  • पोट दुखणं

  • जंत 


व्हिटॅमिन बी3 चा लिव्हरला धोका कसं ओळखाल? 


लिव्हरचं आरोग्य तपासण्यासाठी, तुम्ही दर 6 महिन्यांनी लिव्हर फंक्शन पॅनेल चाचणी करू शकता. यामध्ये तुम्ही लिव्हरशी संबंधित प्रत्येक समस्या सहज जाणून घेऊ शकता.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या बातम्या :


Liver Cancer: लिव्हर कॅन्सर, पुरुषांमधील पाचव्या, तर स्त्रियांमध्ये नवव्या क्रमांकाचा जीवघेणा कर्करोग; लक्षणं अन् उपचार काय?