International Women's Day 2024: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8 मार्च 2024 रोजी 'महिला दिन' (International Womens Day 2024) जगभरात साजरा केला जाणार आहे. आजच्या महिलांची जीवनशैली खूप बदलली आहे. स्त्री घर बनवणारी असो किंवा नोकरी करणारी स्त्री, तिचं संपूर्ण आयुष्य ऑफिस, घर आणि मुलं सांभाळण्यात घालवतं. पण या सगळ्यात ती तिच्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर तिला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांनी घेरलं जातं.


वाढत्या वयाबरोबर गंभीर आजाराचा धोका 


वाईट जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), गर्भाशयाचा कर्करोग (Uterine Cancer), ट्यूमर (Tumor), बीपी (High Blood Pressure), हाय बीपी, थायरॉईडची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. हे लक्षात घेऊन या खास दिवशी आपण 'मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल' बोलुयात. आज महिलांनी अटकेपार झेंडे रोवलेत, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. 


मासिक पाळी (Menstrual Cycle) दरम्यान प्रत्येक महिलेनं स्वच्छतेबाबत जागरुक राहणं गरजेचं आहे. तसेच, या दिशेनं महिलांचं सक्षमीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजही भारतात अशी अनेक गावं आहेत, जिथे महिलांना सॅनिटरी पॅड मिळत नाहीत. 




सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन्स नियमितपणे बदलणं


मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पॉन्स नियमितपणे बदलले पाहिजेत. पॅड किंवा टॅम्पॉन्स दर 4-6 तासांनी बदलले पाहिजेत, जर तेच पॅड तासन्तास बदलले नाही तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या हँडबॅगमध्ये अतिरिक्त सॅनिटरी पॅड ठेवा. 


सॅनिटरी पॅड फेकताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा


सॅनिटरी पॅड फेकून देताना, ते टॉयलेट पेपर किंवा रॅपरमध्ये गुंडाळा आणि वेगळ्या डस्टबिनमध्ये ठेवा. बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड कधीही फ्लश करू नका. कारण ते पाईपमध्ये अडकू शकते. तसेच, त्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होऊ शकतं.




स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या! 


मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कोमट पाणी आणि साबणानं कमीतकमी दोनदा स्वच्छ करा. आंघोळ करा आणि दररोज आतले कपडे बदला. बॅक्टेरिया टाळण्यासाठी सुती कपडे आणि आतील कपडे वापरा.


हायड्रेटेड राहा आणि पौष्टिक अन्न खा


मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्यावं. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवेल. या सर्व व्यतिरिक्त भरपूर फळं आणि भाज्या खा. मासिक पाळी दरम्यान योग्य आहाराचं पालन केलं पाहिजे. कॅफेन आणि खारट पदार्थ खाणं टाळा. कारण मासिक पाळीत हे पदार्थ खाल्ल्यानं सूज आणि अस्वस्थता वाढू शकते.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या बातम्या :


Womens Day 2024 : डॉक्टरपासून ऑटो ड्रायव्हरपर्यंत; समाजाच्या चौकटी मोडून 'या' महिलांनी रोवले अटकेपार झेंडे