Health Care Tips : शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात काही पदार्थांचा नियमित समावेश केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेची पातळी वाढण्याबरोबरच मधुमेहाचा धोकाही लक्षात घ्यावा लागतो. आजकाल बहुतेक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. आहारामुळे साखरेची पातळी वर-खाली होत राहते, जी नियंत्रित करणे मोठे आव्हान बनते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधे घेतात, त्याऐवजी तुम्ही काही गोष्टींचा आहारात समावेश करू शकता ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होईल. मधुमेहाच्या रुग्णांनी भाज्यांचा रस जरूर प्यावा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
बेरी : सकाळच्या नाश्त्याच्यावेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी बेरी खायला हव्यात. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी बेरी प्रभावीपणे उपयुक्त ठरू शकतात.
सफरचंद : सफरचंद आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. सकाळी एक सफरचंद खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे दररोज एक सफरचंद खायला हवे.
संत्री : संत्र्याचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होते. संत्र्यात असलेले पोषक तत्व शरीराला अनेक
आजारांपासून वाचवतात. संत्र्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
टरबूज : टरबूज आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे फळ आहे. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टरबूजाचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Health Tips: पोटाची चरबी कमी करायची आहे? ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचा करा समावेश, काही दिवसांत दिसेल फरक
Health Tips : हिवाळ्यात सारखी सर्दी होते? करा 'हे' घरगुती उपाय
Health Care Tips : पुरेशी झोप, लिंबू, कोमट पाणी... यासारख्या घरगुती उपायानं वजन होईल कमी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha