Winter Skin Care Tips : कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्यांसाठी थंड हवामान (Winter) आणखी आव्हानात्मक बनते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हांला हिवाळ्यात कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर अंघोळ करताना काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करू शकता. आज आम्ही तुम्हांला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही हिवाळ्यात अंघोळ करताना पाळल्या पाहिजेत.


कोरड्या त्वचेसाठी हे नियम पाळा


कमी वेळात आंघोळ करा : हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचा स्वतःच कोरडी होऊ लागते. त्यामुळे जास्त वेळ अंघोळ केली तर त्वचेचे तेल निघून जाते. अशा स्थितीत हिवाळ्यात अंघोळीची वेळ कमी ठेवावी. जेणेकरुन जास्त वेळ पाण्यात राहू नये.


खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा : प्रत्येकाला गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते, परंतु ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. अंघोळ करताना हे लक्षात ठेवावे की पाण्याचे तापमान सामान्य आहे जेणेकरून त्वचानंतर जास्त कोरडी वाटू नये. याशिवाय ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील आहे, त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे.


योग्य साबण निवडा : साबण निवडताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. साबण तुमच्या त्वचेसाठी स्वच्छ करणारे म्हणून काम करतात, त्यामुळे साबण तुमच्या त्वचेवर साठलेली नैसर्गिक आर्द्रता देखील काढून टाकतात. अशावेळी तुम्ही मिल्क बॉडी वॉश किंवा कमी रासायनिक साबण वापरावा.


स्क्रबिंग टाळा : कोरड्या त्वचेवर स्क्रब केल्याने तुमच्या शरीरातील कोरडेपणा आणखी वाढतो. त्यामुळे अंघोळ करताना स्क्रब वापरू नका.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha