Influenza Vaccine Dosage For Kids : पावसाळा (Monsoon) आला की आजारांचा धोका वाढतो. लहान मुले असो किंवा प्रौढ व्यक्ती व्हायरल आजारांचा त्रास अनेकांना होतो. पावसाळ्यात लहान मुलं आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने लहान मुलं बदलत्या ऋतूत जास्त आजारी पडतात. त्यामुळे प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या मुलांनी फ्लूची लस (Flu Vaccine) देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मुलांचं व्हायरल आजारांपासून संरक्षण होतं. 


पावसाळ्याच्या सुरुवातीला लहान मुलांची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी फ्लूची लस देणे फायदेशीर ठरते. पावसाळ्यात मुलांना फ्लू, सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे डॉक्टरही लहान मुलांना फ्लू वॅक्सिन घेण्याचा सल्ला देतात. यामुळे संसर्गजन्य रोगांपोसून मुलांचं संरक्षण होतं.


फ्लूची लक्षण
इन्फ्लूएंझा (Influenza) हा श्वसनासंबंधी विषाणूजन्य आजार आहे. फ्लूची लक्षण साधारणपणे कोरोना विषाणूच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. यामध्ये सर्दी-पडसं, ताप येणं, अंगदुखी यासारखी लक्षणं जाणवतात.


फ्लूची लस लहान मुलांना केव्हा द्यावी?
सहा महिने पूर्ण झाल्यावर लहान मुलांना फ्लूची लस देता येते. पावसाळ्यात लहान मुलांना फ्लूची लस देणं गरजेचं आहे. लहान मुलांना फ्लूमुळे न्युमोनिया आणि ब्रॉकायटिस होण्याची धोका असतो. न्युमोनिया झाल्यावर फुफ्फुसांमध्ये संक्रमण होतं. यामुळे श्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच तीव्र ताप येण्याचीही शक्यता असेत. यापासून संरक्षण म्हणून लहान मुलांना फ्लूची लस देणं फायदेशीर ठरतं. म्हणून डॉक्टर पावसाळ्यात लहान मुलांना फ्लूची लस देण्याचा सल्ला देतात.


ज्या मुलांना श्वसनासंबंधित आजार असतात, अशा मुलांना बदलत्या काळात अधिक समस्यांना सामोरं जावं लागतं. डॉक्टरांच्या मते फ्लूच्या लसीपासून मुलांचं 50 ते 70 टक्के संरक्षण होतं. या लसीमुळे व्हायरल आजारांपासून मुलांचं संरक्षण होतं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :