Aurangabad Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढतांना पाहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात तब्बल 399 रुग्णांची भर पडली असून, मागील चार दिवसात 255 नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. तर यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे.
अशी वाढली रुग्ण संख्या
दिनांक | शहर | ग्रामीण | एकूण |
1 जुलै | 14 | 7 | 21 |
2 जुलै | 25 | 6 | 31 |
3 जुलै | 41 | 12 | 53 |
4 जुलै | 25 | 14 | 39 |
5 जुलै | 61 | 16 | 77 |
6 जुलै | 43 | 13 | 56 |
7 जुलै | 40 | 13 | 53 |
8 जुलै | 40 | 29 | 69 |
एकूण | 289 | 110 | 399 |
सक्रीय रुग्ण संख्या वाढली...
शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 69 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 369 झाली आहे. मात्र गंभीर लक्षणे नसल्याने यापैकी 333 रुग्ण होम आयसोलेशन आहेत. तर 36 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.