Kajal Side Effect : काजळ (Kajal) डोळ्यांसाठी (Eyes Care) अतिशय फायदेशीर मानलं जातं. भारतात एखाद्याला नजर लागू नये म्हणून काजळाचा टिका लावला जातो. अनेक जण सुंदर दिसण्यासाठी काजळ लावतात. याचे डोळ्यासाठी अनेक फायदे आहेत. पण काजळ वापरण्याचे दुष्परिणामही आहेत, हे तुम्हाला माहित नसेल. काजळ वापरल्यानं नुकसान होऊ शकतं. दररोज काजळ किंवा सुरमा वापरणं डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरु शकतं. काजळ वापरण्याचे फायदे आणि दुष्परिणाम जाणून घ्या.


डोळ्यांच्या आत मेकअप किंवा काजळ वापरू नका


आपले डोळे खूप अनमोल आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणं फार गरजेच आहे. आपण डोळ्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. सर्वसाधारणपणे अनेक महिला काजळ वापरतात. आपणही अनेकदा लहान मुलांना काजळ लावतो. तज्ज्ञांच्या मते, काजळ किंवा सुरमा वापरणं टाळा. काजळमध्ये असलेल्या काही रसायनांमुळे डोळ्यांच्या आत जळजळ होऊ शकते. त्याचबरोबर डोळ्यांवर लावलेल्या कोणत्याही प्रकारच्या मेकअपचा वापर करणं टाळा. दररोज रासायनिक पदार्थयुक्त मेकअप वापरणं आरोग्यासाठी घातक आहे. विशेषतः डोळ्यांच्या आत लावलेल्या मेकअपसाठी याची काळजी घेतली पाहिजे.
 
डोळे पूर्णपणे स्वच्छ करा


जर तुम्ही डोळ्यांचा मेकअप करत असाल, तर झोपण्यापूर्वी नेहमी डोळे पूर्णपणे स्वच्छ करा. मेकअप रिमूव्हर वापरून तुमचा मेकअप काढा. एक्सपायरी डेटनंतर कोणतीही सौंदर्यप्रसाधने वापरू नका. मुलांना काजळ लावायची सवय सोडा. डॉक्टरही याला मनाई करतात. जर काजळ लावणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल, तर बाजारातून रसायनयुक्त काजळ लावण्याऐवजी तुम्ही घरी बनवलेली नैसर्गिक काजळ लावा.
 
दररोज काजळ लावल्याने कोणते दुष्परिणाम होतात?



  • डोळ्यात संसर्ग असल्यास काजळ लावू नये, कारण त्यामुळे डोळ्यांना जळजळ होते आणि संसर्गही वाढतो.

  • मस्करामुळे पापण्यांना संसर्ग होऊ शकतो.

  • काजळ, मस्करा, किंवा सुरमा यांचा दररोज वापर केल्याने अंधत्व येऊ शकतं.

  • कॉर्नियल अल्सर, ग्लूकोमा ड्राय आय सिंड्रोम असे डोळ्यासंबंधित आजार होऊ शकतात.

  • काजळमध्ये असलेल्या काही रसायनांमुळे डोळ्यांच्या आत जळजळ किंवा जखम होऊ शकते.

  • काजळमधील रासायनिक घटकांमुळे डोळ्यातील दाब वाढवू शकतात, ज्यामुळे ग्लूकोमा आजार होण्याची शक्यता वाढते.

  • दररोजच्या काजळ वापरल्यामुळे अश्रू ग्रंथींना नुकसान पोहोचू शकतं, ज्यामुळे डोळा ड्राय आय सिंड्रोम होऊ शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.









Retina Health : नजर कमकुवत होण्याला आजाराबरोबरच अनुवांशिकताही असू शकते जबाबदार! जाणून घ्या...


Weight Loss Tips : व्यायाम न करता वजन कमी करायचंय, 'या' टिप्स वापरून मिळवा परफेक्ट फिगर