How to Protect Kids From Eye Flu : सध्या राज्यभरात डोळ्यांची साथ (Conjunctivitis) पसरल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून याबाबत खबरदारी बाळगण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. सर्दी खोकल्याच्या रुग्णांसोबतच सध्या डोळे येण्याच्या रुग्णांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. सध्या लहान-मोठे सर्वांमध्ये ही साथ पसरली आहे. डोळ्यांची साथ परसली आहे, अशा वेळी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी. यापासून लहान मुलांचं संरक्षण कसं करावं हे सविस्तर जाणून घ्या.


डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली


डोळ्यांचा संसर्ग होणे, या कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis) आणि डोळे येणे किंवा पिंक आय असंही म्हणतात. या डोळ्याच्या संसर्गामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होते. कंजंक्टिवा हा डोळ्यातील एक  थर आहे जो डोळ्याचा पांढरा भाग आणि पापण्यांच्या आतमध्ये असतो, याला संसर्ग झाल्यास डोळे लाल होतात आणि जळजळ होते, यालाच आपण डोळे येणे किंवा आय फ्लू असं म्हणतो. आय फ्लूमध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागात संसर्ग पसरतो. त्यामुळे रुग्णाला पाहण्यात खूप अडचणी येत आहेत. 


पावसाळ्यात डोळे येण्याचं प्रमाण वाढतं


सामान्यापणे पावसाळ्यात डोळे येण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात कमी तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे लोक जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीच्या संपर्कात येतात. या ऍलर्जी प्रतिक्रिया आणि संक्रमणांमुळे डोळ्यांनाही संसर्ग होतो.


डोळ्यांचा फ्लू स्पर्शाने पसरतो


डोळ्यांचा फ्लू स्पर्शाने पसरतो. एका डोळ्यात कंजंक्टिवायटिस झालेला असल्यास त्याला हाताने स्पर्श केल्यानंतर त्याच हाताने दुसऱ्या डोळ्याला स्पर्श केला तर त्या डोळ्यातही संसर्ग होतो. जर तुम्ही त्याच हाताने दुसऱ्याला व्यक्तीला स्पर्श केला तर त्या व्यक्तीलाही डोळ्यांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. 


शाळेत जाणाऱ्या मुलांना डोळ्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी काय करता येईल?


तुमच्या मुलांना शाळेत तर पाठवावं लागेल, नाहीतर शिक्षणाचं नुकसान होईल. पण, त्यांचं डोळ्यांच्या साथींपासून संरक्षण कसं करावं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, अशा परिस्थितीत मुलांचं डोळ्यांच्या फ्लूपासून संरक्षण करण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.


डोळ्यांच्या साथीपासून लहान मुलांचं 'असं'  संरक्षण करा



  • मुलांचा गणवेश स्वच्छ असावा.

  • मुलांना वारंवार डोळ्यांचा स्पर्श करण्यास मनाई करा.

  • मुलांना वारंवार हात धुण्यास सांगा.

  • ते शक्या नसेल तर, मुलांच्या बॅगेत सॅनिटायझर ठेवा आणि ते वापरायला सांगा.

  • शाळेतून आल्यावर मुलांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.

  • स्वच्छ हाताने डोळे पाण्याने धुवा.

  • संक्रमित व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांपासून मुलांना दूर ठेवा.

  • मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिण्यास सांगा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Eye Flu : डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली! संसर्ग टाळण्यासाठी करा 'हे' 5 घरगुती उपाय