Eye Flu Home Remedy : पावसाळ्यात इतर व्हायरल आजारांसोबतच डोळ्यांच्या साथीमुळे (Pink Eye) चिंता वाढली आहे. सध्या डोळे येण्याचे (Conjunctivitis) झपाट्याने वाढत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांतून आय फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्याच्या साथीच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यामुळे आय फ्लू किंवा डोळ्यांचा संसर्ग म्हणजे काय आणि डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी पाच घरगुती उपाय जाणून घ्या.


आय फ्लू म्हणजे काय?


आय फ्लू (Eye Flu) हा डोळ्यांना होणारा संसर्ग आहे. याला कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis), पिंक आय (Pink Eye), डोळे लाल होणे असेही म्हणतात. सामान्य भाषेत याला डोळे येणे असंही म्हणतात.


डोळ्यांचा संसर्ग दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय


1. मध 


मध हा डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी मदतशीर ठरू शकतो. मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. डोळ्यांचा संसर्ग झाल्यास तुम्ही मध वापरु शकता. एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध घाला. त्यानंतर या मधाच्या पाण्याने डोळे धुवा. डोळ्यातील जळजळ आणि वेदना मधाच्या पाण्याने लवकर दूर होतील.


2. गुलाबपाणी


डोळ्यांच्या फ्लूपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबजल देखील वापरू शकता. गुलाब पाण्यामध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे संक्रमण करणाऱ्या जंतूंशी लढण्यास मदत होते. गुलाबपाणी डोळ्यांच्या फ्लूमुळे होणारी समस्या कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो. यासाठी फक्त गुलाब पाण्याचे दोन थेंब डोळ्यात टाका.


3. बटाटा


डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरू शकतो. बटाट्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने डोळ्यांच्या संसर्गामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी बटाट्याचे गोल काप करून ते डोळ्यांवर ठेवा. बटाट्याचे तुकडे 10-15 मिनिटे डोळ्यांवर राहू द्या.


4. तुळशी


तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटीऑक्सिडेंट हे उपयोगी गुणधर्म आहेत. तुळशीची काही पाने पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी यातील तुळशीची पानं गाळून या पाण्याने डोळे धुवा.


5. हळद


हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. हळदीमध्ये असलेले औषधी गुणधर्म डोळ्यांच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात. अर्धा चमचा हळद पावडर थोड्या कोमट पाण्यात मिसळा. नंतर हळदीच्या पाण्यात कापूस भिजवून डोळ्यांना लावा. यामुळे डोळ्यांमधील घाण निघून जाईल. तसेच वेदना आणि जळजळीपासून आराम मिळेल.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sabudana : साबुदाणा खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या