मुंबई : डायबिटीक फुट अल्सरमध्ये तुम्हाला पायांच्या तळव्याला वेदना होतात. दिसायाला ही छोटीशी जखम किंवा लाल रंगाच्या डागाप्रमाणे दिसतो. परंतु, या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या समस्येमुळे अनेकांना आपला पाय गमवावा लागला आहे.


डायबिटीज म्हणजेच, मधुमेहाचे जेवळपास 10 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना आपल्या आयुष्यात या समस्येचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया डायबिटीज फुट अल्सर म्हणजे, नेमक काय?


डायबिटीक फुट अल्सर काय आहे?


मधुमेहाचा परिणाम आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर होत असतो. अनेकदा असं दिसून येतं की, डायबिटीजच्या रुग्णांच्या पायांवर जखमा किंवा अल्सर होतात. जर वेळीच लक्ष दिलं नाहीतर या जखमा वाढतात. त्यामुळे व्यक्तीला गंभीर संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. याला डायबिटीक फुट अल्सर असं म्हणतात. अशा जखमांची सुरुवात अत्यंत सामान्यपणे होते. त्यामुळे सुरुवातीला व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात. मधुमेहाचे 10 टक्क्यांहून अधिक रुग्णांना आपल्या आयुष्यात या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीपासूनच सावधानता बाळगली तर तुम्ही डायबिटीक फुट अल्सरपासून तुमचा बचाव करू शकता.


डायबिटीक फुट अल्सर अत्यंत धोकादायक


डायबिटीजच्या रूग्णांना आरोग्याच्या इतरही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक म्हणजे, डायबिटिक फूट अल्सर. पायांना अल्सर झाल्यामुळे स्किनचे टिशू तुटतात आणि त्याखालील स्किनची लेयर दिसू लागते. पायांमध्ये अल्सर अंगठा आणि तळव्यावर होतात. पण हे अल्सर पायांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. अल्सर हाडांना प्रभावित करतात. पायांना अल्सर होण्याचा धोका डायबिटीजने ग्रस्त असलेल्या रूग्णांना अधिक असतो. पायांची व्यवस्थित देखभाल केल्याने यापासून सुटका करणं सहज शक्य होतं. जर तुमच्या पायांच्या त्वचेचा रंग बदलत असेल तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणं गरजेचं असतं. कधी-कधी असं होतं की, पायांना अल्सर होण्याआधी त्याबाबत काहीच त्रास जाणवत नाही. डायबिटीजचं सर्वात मोठं कारण म्हणजे, व्हिटॅमिन डीची कमतरता होते. असं सांगण्यात येतं की, जर एखाद्या व्यक्तीला एकत्र लठ्ठपणा आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर डायबिटिक फूट अल्सर होण्याचा धोका वाढतो.


डायबिटीज फुट अल्सरच्या धोक्यापासून कसा बचाव करावा?




  • जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागले. ज्यामुळे तुम्ही डायबिटीक फुट अल्सरच्या समस्येपासून बचाव करू शकता.

  • सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही ब्लड शुगर कंट्रोल करून याचा धोका टाळू शकता. जर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात असेल जखम लवकर बरी होते. परंतु, जर रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर मात्र जखम बरी होण्याऐवजी वाढते.

  • तुमच्या पायांची काळजी घ्या. जर तुम्हाला तुमच्या पायांवर छोटीशी जखम, लाल निशाण दिसून आले, तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क करा. साधारणतः असे फुट अल्सर ठिक करण्यासाठी डॉक्टर इंफेक्शन असणाऱ्या भागांतील त्वचा कापून वेगळी करतात. त्यामुळे जखम लगेच भरते.

  • याव्यतिरिक्त डॉक्टर तुमच्या जखमेवर ड्रेसिंग करतात. तसेच हे ड्रेसिंग दररोज बदलणं गरजेचं असतं. एकच ड्रेसिंग अनेक दिवस जखमेवर ठेवल्याने इंन्फेक्शन वाढतं.

  • डायबिटिक फुट अल्सरमध्ये डॉक्टर काही दिवसांसाठी आराम करण्याचाही सल्ला देतात.


(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काढा फायदेशीर; असा करा तयार

व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक; जाणून घ्या मुख्य स्त्रोत

डिप्रेशन जीवघेणं ठरु शकतं, याची लक्षणे कोणती?

लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन

Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय