मुंबई : जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती याबाबत सगळीकडे चर्चा होताना दिसत आहेत. याचं कारणही कोरोना व्हायरसच आहे. जर तुम्ही रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर कोरोनाचा धोका तुलनेनं कमी असल्याचं आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांसोबतच डॉक्टर्सही देत आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती आजार किंवा व्हायरससोबत लढते आणि आपला बचाव करते. त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं अत्यंत आवश्यक आहे.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो काढा :
प्रसिद्ध शेफ अनहिता ढोंडी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काढ्याची रेसिपी शेअर केली आहे. हा काढा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. ही रेसिपी एका आयुर्वेदीक काढ्याची आहे. घरातच सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून काढा तयार करता येणार आहे.
आपल्या घरातील वडिलधारी माणसंही अनेकदा वेगवेगळ्या काढ्यांचे फायदे आपल्याला सांगतात. अनेकदा काढ्याचा वापर अनेक आजारांवरील घरगुती औषध म्हणूनही केला जात असे. कोरोना काळातही आरोग्य उत्तम राहावं यासाठी अनेकजण घरगुती उपायांना प्राधान्य देत आहेत.
काढ्यामध्ये हळद, तुळशीची पानं, वेलची, लवंग यांसारख्या घरगुती पदार्थांपासून काढा तयार केला जातो. आयुर्वेदातही या पदार्थांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. हे पदार्थ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
असा तयार करा आरोग्यासाठी गुणकारी ठरणारा काढा :
शेफ अनाहिता यांनी काढा तयार करतानाटा आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. यासाठी हळद, तुळशीची पानं, लवंग, वेलची, काळी मिरी आणि आलं यांसारख्या पदार्थांचा वापर केला आहे. काढा तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करा. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि आल्याची मिक्सरमध्ये एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. पाणी गरम झाल्यावर ही पेस्ट पाण्यात घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये इतर गोष्टी एकत्र करून 15 ते 20 मिनिटांपर्यंत उकळून घ्या. काढा तयार आहे. काढा गरम गरम प्या.
(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक; जाणून घ्या मुख्य स्त्रोत
डिप्रेशन जीवघेणं ठरु शकतं, याची लक्षणे कोणती?
Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय
Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन