Health Tips : आपल्याला जर निरोगी राहायचे असेल तर आपल्याला पौष्टिक आहार अत्यंत गरजेचा असतो. या आहारात भाजीपाला, सुका मेवा, फळांसह विविध घटकांचा समावेश होतो. दररोज फळांचे (Fruits) सेवन करणे चांगले असते. कारण फळे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक पुरवतात. मात्र फळांमध्ये शुगर (Sugar) कंटेंन असल्याने मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांनी आवश्यक तितकेच फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. 


फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असल्याने फळे खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वाढते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना धोका उद्भवू शकतो. तसेच काही लोकांचे वजनदेखील वाढू शकते. त्यामुळे फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स तपासल्याशिवाय ती खाऊ नयेत.फळांचा ग्लायसेमिक इंडेक्सच्या (Glycemic index) सहाय्याने खाद्यपदार्थातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मोजले जाते. सर्वसाधारणपणे 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी लाभदायक असतं, असे तज्ञ सांगतात.  कुठल्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ते जाणून घेऊयात 


द्राक्ष (Grapes)


द्राक्ष प्रकृतीसाठी अत्यंत चांगली असतात. द्राक्षामधील व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहग्रस्त व्यक्तींनी द्राक्ष खाणे हे धोक्याचे ठरू शकते. 


अंजीर (Fig)


अंजीर हे फळ अनेक पोषक तत्त्वांनी बनलेले आहे. अनिजीराचा शरीराला चांगला उपयोग होतो. शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी अंजीरांचे सेवन लाभदायक ठरते. पण, अंजिराचे सेवन मुधुमेहग्रस्तांसाठी हानिकारक ठरू शकते. अंजिराने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याने डॉक्टर अंजीर न खाण्याचाच सल्ला मुधुमेह झालेल्या व्यक्तींना देतात. 


आंबा (Mango)


आंब्याला फळांचा राजा म्हणून संबोधले जाते. आंब्यात शरीरासाठी लागणारे पोषक घटका असतात. त्यात  व्हिटॅमिन ए देखील असते. मात्र, आंबा जितका पौष्टिक आहे तितकाच तो हानिकारकदेखील ठरू शकतो. कारण आंब्यात साखरेचे प्रमाण अत्यंत जास्त असते. एका आंब्यात सुमारे ४६ ग्राम इतके साखरेचे प्रमाण असू शकते. मधुमेहग्रस्तांनी जर आंबा खाल्ला तर त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. म्हणून डॉक्टर नेहमी मधुमेह झालेल्या व्यक्तींना आंब्यापासून दूरच राहा, असा सल्ला देतात. 


कलिंगड (watermelon)


उन्हाळ्यामध्ये कलिंगड फळ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते.  कारण उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास टरबूज मदत करते. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, जीवनसत्त्वे B1 आणि B6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, लायकोपीन ही जीवनसत्व असतात. मात्र त्यात साखरेचे प्रमाणदेखील अधिक असते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कलिंगड खाणे टाळायला हवे, असा सल्ला आहारतज्ञ देतात.


त्यामुळे मुधुमेह असलेल्यांनी आपल्या आहारात कुठल्याची फळांचे सेवन करण्याआधी डॉक्टर किंवा आहारतज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Carrot and Health :  फायदेशीर असले तरी गाजराच्या अतिसेवनाने होऊ शकतो गंभीर आजार; 'या' व्यक्तींना आहे धोका