COVID 19 Update JN.1 : देशभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus Update in India) वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली (Corona Cases) आहे. वर्षाच्या शेवटी देशभरात कोरोनानं (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे (JN.1 Coronavirus) डोकेदुखी वाढली आहे. कोरोना विषाणूच्या (Covid-19 Virus) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा (Corona New Variant) सब-व्हेरियंट (Corona New Sub-Variant) JN.1 मुळे सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळ, कर्नाटक, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोनाचे 743 नवीन रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाचे 3997 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 743 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृतांमध्ये केरळमध्ये 3, कर्नाटकात 2 आणि छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात JN.1 ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात कोरोनाचे उप-प्रकार JN.1 संसर्गाचे पहिले प्रकरण ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळून आले.
नव्या व्हेरियंटचा वाढता धोका
दिल्लीमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पण, केवळमध्ये सातत्याने नवीन रुग्णांची भर पडताना दिसत आहे. प्रशासनाने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. दिल्लीत शनिवारी कोरोनाच्या 11 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 51 आहे आणि आतापर्यंत दिल्लीतील एकूण कोरोना
रुग्णांची संख्या 20,14,467 वर पोहोचली आहे.
नवीन व्हेरियंटचा संसर्ग वाढण्याची शक्यता
कोरोना विषाणू आल्यापासून त्याची रूपे वेळोवेळी बदलत आहेत. अलीकडेच, दिल्लीमध्येही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब-व्हेरियंट JN.1 चा पहिला रुग्ण आढळला आहे. मात्र, उपचारानंतर आता हा रुग्ण बरा झाला आहे. येत्या काही दिवसांत कोविड विषाणूच्या नवीन प्रकारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे पण, दिलासादायक बाब म्हणजे याची लक्षणे सौम्य आहेत.