Curry Leaves : कढीपत्ता बाजूला काढता? जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे
Curry Leaves : स्वाद आणणारा कढीपत्ता आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे.
Curry Leaves : कोणताही पदार्थ चवदार करायचा असेल तर त्यात कढीपत्ता घातला जातो. चवीसाठी वापरला जाणारा कढीपत्ता आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. डाळ, आमटी, कढी यामध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण जेवणाला चव आणण्याव्यतिरिक्तही कढीपत्ताचे फायदे आहेत.
केसांसाठी उपयोगी
केसांसाठी कढीपत्ता बहुगुणी आहे हे अभ्यासातून सिद्ध झालेले आहेच. अनेकांना केसांच्या तक्रारी असतात. त्यात प्रामुख्याने केसगळती, कोंडा आणि पांढरे केस, कोरडे केस ही केसांची समस्या अगदी सर्वसाधारण आहे. या सगळ्यावर कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे. कडीपत्ता केसांसाठी खूप उपयोगी आहे.
चेहऱ्याचा पोत सुधारतो
कढीपत्ता रक्तशुद्धीकरणाचे काम करत असल्याने चेहऱ्याचा पोत सुधारतो तसेच आरोग्याच्या इतर तक्रारींपासूनही सुटका होते.
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास फायदेशीर
कढीपत्त्याची पूड मुलतानी माती किंवा लिंबू किंवा मध यांच्यामध्ये एकत्र करुन लावल्यास चेहरा उजळण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे घरगुती फेसपॅक करुन तुम्ही चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता.
वजन ठेवते नियंत्रणात
जर तुमचे वजन वाढत असेल तर कढीपत्ता तुम्हाला वजन कमी करायला मदत करू शकतो. वजन कमी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्या डाएटमध्ये कढीपत्त्याचाही समावेश करा कारण त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकेल.
सर्दी, कफ यांसारख्या तक्रारींवरही कढीपत्ता अतिशय फायदेशीर ठरतो. अशावेळी पदार्थांमध्ये कढीपत्ता घालण्याबरोबरच कढीपत्त्याची चटणी केल्यास त्यातून जास्त प्रमाणात कढीपत्ता पोटात जाऊ शकतो.
अनेकांना केसांच्या तक्रारी असतात. त्यात प्रामुख्याने केसगळती, कोंडा आणि पांढरे केस, कोरडे केस ही केसांची समस्या अगदी सर्वसाधारण आहे. या सगळ्यावर कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )