Coronavirus Update : अमेरिका सरकार (US Government) एका मोठ्या संशोधनातून खुलासा केला आहे की, कोरोनाबाधित न झालेल्या गर्भवती महिलांपेक्षा ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांना बाळंतपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनाबाधित गर्भवती महिलांना बाळंतपणात अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याशिवाय स्टिलबर्थ (Stillbirth) म्हणजेच, गर्भपात होण्याचा धोकााही अधिक असतो. त्यासोबतच या संशोधनात म्हटलं गेलं आहे की, डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) ची लागण झाल्यानंतर हा धोका जवळपास चार पटींनी अधिक वाढतो. सेंटर्स फॉर डिजीज अँड प्रिवेंशन (Centers for Disease Control and Prevention) चं हे विश्लेषण मार्च 2020 आणि सप्टेंबर 2021 मध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या रुग्णालयात झालेल्या 1.2 दशलक्ष प्रसूतींवर आधारित होतं.
संशोधनातून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित मातांनी मृत बालकांना जन्म दिल्याची प्रकरणं अत्यंत दुर्मिळ होती. सरासरी हा दर 0.65 टक्के होता. परंतु, कोरोनाचा संसर्ग झालेल्या मातांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या आधी स्टिलबर्थ 1.47 पटींनी अधिक सामान्य होतं. डेल्टा व्हेरियंटनंतर हे प्रमाण 4.04 पटींनी अधिक आणि समग्र रुपात 1.90 पटींनी अधिक होतं.
संशोधकांनी संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या संशोधनात असं सुचवलं होतं की, वाढीव जोखीम होण्याचं संभाव्य जैविक कारण नाभीसंबधीचा दाह किंवा रक्त प्रवाह कमी होण्याचा परिणाम असू शकतो. ते म्हणाले की, "कोरोनामुळे (Corona) स्टिलबर्थचा धोका वाढतो. कोरोनाबाधित मातांची प्रसूती अधिक गुंतागुंतीची होते, तसेच अनेक समस्या उद्भवतात. त्याबाबत अधिक तथ्य तपासून पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे या प्रकरणात अधिक संशोधनाची गरज आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- व्यायाम करणं चांगलंच पण शारीरिक हालचालींमुळं शरीरात 'कॅनबिस' वाढू शकतं! : रिपोर्ट
- Health Care Tips : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवतील 'या' गोष्टी; फक्त आहारात थोडे बदल करा
- Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत
- Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स