Oxygen Level : सध्या प्रदुषणामुळे अनेकांच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवायची असेल तर, तुम्हाला डाएटकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. शरीरातल ऑक्सिजन वाढल्याने इम्यूनिटी देखील वाढते. जाणून घेऊयात ऑक्सिजन लेव्हल वाढण्याची सोपी पद्धत-
भरपूर पाणी प्या- जर तुम्हाला शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवायची असेल तर तुम्ही रोज भरपूर पाणी पिले पाहिजे. जेव्हा आपण पाणी पितो. तेव्हा आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. तसेच शरीर हायड्रेट राहते. आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.
मिठ कमी असणारे पदार्थ खा- आयुर्वेदानुसार कमी मिठ असणारे पदार्थांचा समावेश आहारात करावा. कारण जास्त मिठ असलेले पदार्थ खाल्याने वॉटर रिटेंशन होते त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच शरीरातील पोटेशियम कमी झाल्यामुळे देखील श्वास घ्यायला त्रास होतो.
शरीरात ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासठी हिमोग्लोबिन जास्त असणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. आवळा, पेरू, हिरव्या पालेभाज्या, पोहे आणि लिंबू इत्यादी गोष्टी खाल्याने ऑक्सिजन लेव्हल वाढते.
शरीरात ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासठी हे हेल्दी ड्रिंक प्या
ड्रिंक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य- गाजर, डाळिंब, बीट, पालक, संत्री, हळद, दालचिनी पावडर
गाजर, डाळिंब, बीट, पालक, संत्री, हळद, दालचिनी पावडर हे सर्व ज्यूसरमध्ये टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर गाळण्याने गाळून हा ज्यूस दरररोज सकाळी प्या.
Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स
टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.