Ghee In Hot Milk : अनेक जण झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर दूध पितात. काही लोकांना हळद टाकून दूध पिण्याची सवय असते. हळद उष्ण असते. त्यामुळे हळद दूध प्यायल्याने अनेकांना त्रास होऊ शकतो. थंडीमध्ये दूधात तूप टाकून प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. भारतीय पाकशास्त्रामध्ये तूपाला फार महत्त्वं आहे. आयुर्वेदात उल्लेख करण्यात आलेल्या मौल्यवान साहित्यामध्येही तूपाचा समावेश होतो. त्वचा आणि केसांसाठी तर तूप म्हणजे जणू एक वरदान. आर्युवेदानुसार, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज तूप टाकलेले दूध पिले पाहिजे. जाणून घेऊयात गरम दूधात तूप टाकून प्यायल्याने होणारे फायदे-
1. सांधे दुखीचा त्रास होत नाही- हिवाळ्यात अनेकांना सांधे दुखीचा त्रास होतो. तूप टाकलेले गरम दूध प्यायल्याने तुम्हाला सांधे दूखीचा त्रास होणार नाही. या दूधाने सांध्यांमधील इन्फ्लामेशन कमी होते. तसेच हडे देखील मजबूत होतात.
2. दूधामध्ये तूप टाकून तुम्ही पिले तर शरीरात एंजाइम्स रिलीज होतात. हे एंजाइम्स तुमची पचन शक्ती वाढवतात. त्यामुळे जर तुम्हाला अपचन होत असेल तर तुम्ही रोज एक ग्लास तूप टाकलेले दूध पिले पाहिजे.
3.दूधात तूप मिक्स करून प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म वाढते.
4. तूप टाकलेले दूथ पिल्याने तुमची स्किन देखील चांगली होईल. या दूधाने ड्रायनेस कमी होऊन त्वचा मॉइस्चराइज होते.
Health Care Tips : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवतील 'या' गोष्टी; फक्त आहारात थोडे बदल करा
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.