Exercise : मानवी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आयुष्यासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमितपणे व्यायाम करणे शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या फायद्याचे आहे. व्यायाम आणि शारीरिक हालचालींमुळे अनेक शारीरीक समस्या दूर होतात. नुकत्याच एका रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे की, व्यायाम केल्याने शरीरातील कॅनबिससारखे पदार्थ वाढतात. अभ्यासानुसार, यामुळे संधिवात, कर्करोग आणि हृदयरोग यांसारख्या आजारांची शक्यता दूर होऊ शकतात. Gut Microbes मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, नॉटिंगहॅम विद्यापीठातील तज्ज्ञांनी असे शोधून काढले की, ज्या लोकांना संधिवात असून ते दररोज व्यायाम करतात त्यांच्या वेदना कमी होतात. तसेच दाहक पदार्थांची पातळी देखील कमी होते. ज्याला सायटोकिन्स देखील म्हणतात. यामुळे शरीरातच निर्माण होणाऱ्या कॅनबिस पदार्थांच्या पातळीत वाढ होते, या पदार्थांना अँडोकॅनाबिनॉइड्स असे संबोधले जाते. विशेष म्हणजे, व्यायामामुळे आतड्यांमधील सूक्ष्मजंतूंमध्ये बदल होतात.
यूके स्थित युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्राध्यापक अना वाल्डेस यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या गटाने एक प्रयोग केला ज्यामध्ये संधिवात असलेल्या 78 लोकांची चाचणी घेण्यात आली. त्यामधील 38 लोकांनी सहा आठवड्यांपर्यंत दररोज 15 मिनिटे स्नायू बळकट करण्याचे व्यायाम केले आणि 40 जणांनी कोणताही व्यायाम केला नाही. हा प्रयोगा केल्यानंतर असे लक्षात आले की , ज्या लोकांनी प्रयोगा दरम्यान व्यायाम केला त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि त्यांच्या आतड्यांमध्ये अधिक सूक्ष्मजंतू आढळले. सूक्ष्मजंतू अशा प्रकारचे होते जे दाहक-विरोधी पदार्थ, सायटोकाइन्सचे निम्न स्तर आणि एंडोकॅनाबिनॉइड्सचे उच्च स्तर तयार करतात.
Health Care Tips : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवतील 'या' गोष्टी; फक्त आहारात थोडे बदल करा
एंडोकॅनाबिनॉइडची उच्च पातळी आतड्यांतील सूक्ष्मजंतू आणि आतड्यांतील सूक्ष्मजंतूंद्वारे निर्माण होणार्या दाहक-विरोधी पदार्थांमधील बदलांशी संबंध दर्शवते, ज्याला शॉर्ट-चेन-फॅटी-ऍसिड (SCFAS) म्हणतात. आतड्याच्या मायक्रोबायोमच्या दाहक-विरोधी प्रभावांपैकी किमान एक तृतीयांश परिणाम एंडोकॅनाबिनॉइड्सच्या उच्च पातळीमुळे होते.
Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स