Coronavirus cases in India: जगभरातील लाखो लोकांना कोरोनाचा (Corona Virus) फटका बसला आहे. त्यानंतर कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. भारतात 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्याचे काम सुरु आहे. परंतु, लहान मुलांसाठी कोरोना रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे.
लहान मुलांमध्ये कोरोनाची विविध प्रकारची लक्षणे दिसतात. पण, काही लक्षणे साधारणपणे प्रत्येकामध्ये दिसतात. मुलांमध्ये ताप, थकवा, खोकला, चव आणि वास कमी होणे ही कोरोनाची काही सामान्य लक्षणे दिसत आहेत. याशिवाय मुलांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम दिसत असल्याचीही चर्चा आहे.
डॉक्टरांच्या मते, मुलांच्या हृदय, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, पचनसंस्था, मेंदू, त्वचा किंवा डोळे अशा अनेक अवयवांमध्ये तीव्र जळजळ होत आहे. अलीकडेच, एका अहवालात असे समोर आले आहे की, ओमायक्रॉनमुळे (Omicron) 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये डांग्या खोकल्याची समस्या देखील दिसून येत आहे.
मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे
एवढेच नाही, तर कोरोनाच्या विळख्यात येणाऱ्या मुलांच्या श्वसनमार्गामध्ये संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास, ताप, आवाजात बदलाव आणि श्वास घेताना आवाजाचा त्रास होऊ शकतो. यासोबतच मुलांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास कोरोनाची चाचणी करून घ्या आणि डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha