Health Tips : नाक बंद, सर्दी, डोकेदुखीने त्रस्त अशा स्थितीत शरीराचे काय हाल होतात, हे फक्त तीच व्यक्ती सांगू शकते, ज्याला नाक बंद झाल्यामुळे श्वासदेखील घेता येत नाही. यावर वेळीच उपचार न केल्यास तो विषाणू किंवा फ्लूचे रूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत ते टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा. जर, सर्दीमुळे नाक बंद झाले असेल, वास आणि चव देखील समजत नसेल, तर उशीर न करता तुमची कोविड चाचणी करून घ्या. कारण सध्या कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेची लक्षणे सारखीच आहेत.
अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. उदाहरणार्थ, गरम पाणी पिणे. जेव्हा तुमचे नाक बंद असेल, तेव्हा थंड गोष्टींना नाही म्हणायला शिका. शक्यतो या काळात फक्त गरम पाणी प्या. तुम्ही गरम पाण्यात मध किंवा आल्याचा रस टाकून पिऊ शकता. यामुळे घसा आणि नाक दोन्हींना खूप आराम मिळेल. त्याच वेळी, गरम पाण्याची वाफ देखील बंद नाकाच्या समस्येपासून आराम देईल. त्यामुळे छातीत साचलेला कफ सहज बाहेर पडतो.
सर्दीचा त्रास होत असल्यास नोझल स्प्रे वापरा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. अशा काही टिप्स आहेत, ज्याचा वापर करून तुम्हाला आराम मिळेल. मात्र, तुम्हाला इतर कोणताही इतर आजार असल्यास, कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी जरूर संपर्क साधा. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही ऍलर्जीची समस्या टाळू शकाल आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली तुमचे योग्य उपचारही होतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha