Cancer Prevention : कॅन्सर म्हटलं की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. कॅन्सरमुळे मृत्यू पावलेल्या लोकांच्या कथा ऐकूण आपल्या भीतीत अजूनच भर पडते. पण या मागचं मूळ कारण आहे ते म्हणजे कॅन्सरबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसणं. कॅन्सरची लक्षणे (Cancer Symptoms) योग्य वेळी ओळखली गेली तर तो बरा केला जाऊ शकतो. पण आपल्याला कॅन्सरची लागण झाली आहे हे लक्षात यायलाच बराच वेळ जातो. त्यामुळेच कॅन्सरच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.


कॅन्सरची लागण झाला आहे किंवा कॅन्सर पहिल्या स्टेजला आहे हे जर समजलं नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो आणि त्याचा धोका वाढत्या वयाबरोबर वाढत जातो. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, सिगारेट, तंबाखू आणि अल्कोहोल यासारख्या काही सवयी कॅन्सरचा धोका वाढवतात. 


Low Grade Cancer and High Grade Cancer : लो आणि हाय ग्रेड कॅन्सर


तज्ज्ञांच्या मते, शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सर होऊ शकतो. त्यापैकी यकृताचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, जनरल कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर हे सर्वाधिक आढळतात. बहुतेक लोक या कॅन्सरच्या आजारांनी ग्रस्त आहेत. काही कॅन्सर त्वचेला होतात तर काही स्नायूंमध्ये होतात. कॅन्सर हा लो ग्रेड म्हणजे कमी तीव्रतेचा आणि हाय ग्रेड म्हणजे जास्त तीव्रतेचा अशा श्रेणीमध्ये विभागलेला आहे. लो ग्रेड कॅन्सर शरीरात हळूहळू पसरतो. तर हाय ग्रेड कॅन्सर वेगाने पसरतो. हाय ग्रेड कॅन्सरमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो. वयाच्या 50 वर्षांनंतर कर्करोगाचा धोका वाढतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. काही लोकांना तो अनुवांशिक कारणांमुळे होते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.


Cancer Treatment : कॅन्सरवरील उपचार


कॅन्सरचा प्राथमिक अवस्थेत शोध लागल्यास उपचाराने रुग्णाचा जीव वाचू शकतो. कॅन्सर एका जागी मर्यादित असेल तर त्यावर शस्त्रक्रियेने उपचार करता येतात. पण जर तो अधिक अवयवांमध्ये पसरला तर केमोथेरपी, रेडिओथेरपी अशा अनेक उपायांचा अवलंब केला जातो. कॅन्सर झाल्यानंतर रुग्णाने ताबडतोब योग्य डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे, जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल. विलंबाने मृत्यूचा धोका वाढतो.


ही बातमी वाचा: