Family Care Tips: कुटुंबात विविध वयोगटाचा समावेश असतो, वयोगटानुसार फिटनेसची उद्दिष्टे बदलू शकतात. कुटुंबाचे आरोग्य नीट राहावे यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे, प्रौढ व्यक्तीने दर आठवड्याला किमान अडीच शारीरिक हालचालींचे व्यायाम करायला पाहिजे. कुटुंबाने नियमित व्यायाम करणे निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते, तणाव कमी करते,आरोग्य विकार आणि गंभीर धोका कमी करते. कुटुंबाची योग्य काळजी घेण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे.


1. तुमच्या कुटुंबाला वेळ देण्याला प्राधान्य द्या


शारीरिक व्यायामांसाठी एक नियमित रुटीन तयार करा. कुटुंबाने सकाळी एकत्र चालणे, सायकल चालवणे, हाईकिंग किंवा मैदानी खेळांना प्राधान्य द्या. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे किंवा चालणे किंवा आसपासच्या परिसरात सायकल चालवणे यांसारख्या गोष्टींसाठी प्रेरित करा. घरातल्या घरात एकत्र कवायती करणे किंवा डान्स करणे देखील कुटुंबाला एकत्र जोडून ठेवते.


2. तुमच्या व्यायामाच्या दिनचर्येत मजेशीर गोष्टींचा समावेश करा


नेहमी तोच तोच व्यायाम करण्यापेक्षी कधी-कधी त्यासोबत इतर खेळ देखील खेळा. बॅटमिंटन किंवा हँडबॉल खेळताना तुम्ही कुटुंबातील सर्व व्यक्तींना त्यात सामावून घेऊ शकतात. लहान मुलांपासून पालकांपर्यंत सर्वजण खेळाची मज्जा घेऊ शकतात.


3. पोषणावर लक्ष केंद्रित करा


एकूणच आरोग्यासाठी शारीरिक हालचालींसोबतच संतुलित आहार घेण्यावर भर देणे गरजेचे आहे. एक कुटुंब म्हणून, तुम्ही तुमच्या जेवणाचे नियोजन करू शकता, एकत्र किराणा माल खरेदी करू शकता आणि पौष्टिक जेवण एकत्र बनवू शकता. कुटुंबातील प्रत्येकाला किचनमधील एखादे काम वाटून द्या, त्यामुळे अवयवांचाही व्यायाम होतो.


4. वास्तववादी ध्येय सेट करा


तुमच्या कौटुंबिक क्षमता आणि स्वारस्यांवर आधारित नेहमी वास्तववादी फिटनेस ध्येय सेट करा. जितके जमेल तितकेच व्यायाम प्रकार करा, कुटुंबातील व्यक्तींवर एखादा व्यायाम करण्यासाठी ताण देऊ नका.


5. एक आदर्श बनण्याचा प्रयत्न करा


व्यायामाप्रती उत्साह आणि सकारात्मकता दाखवा आणि यामुळे तुमच्या कुटुंबालाही ते करण्यास प्रेरणा मिळेल. निरोगी जीवनशैलीसाठी तुमची बांधिलकी दाखवा, तुम्हाला पाहून तुमच्या कुटुंबालाही नियमित व्यायाम करण्याची प्रेरणा मिळेल.


6. नित्यक्रम ठरवा


फिटनेस राखण्यासाठी सर्वांवर सक्ती करण्याचा प्रयत्न करू नका. नृत्य, पोहणे किंवा नवीन खेळ एकत्र करून पाहा, यासारखे विविध क्रियाकल्प एक्सप्लोर करा. हे प्रत्येकाला व्यस्त आणि प्रेरित ठेवण्यास मदत करते.


7. नियमित आरोग्य तपासणी करुन घ्या


कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नियमित आरोग्य तपासणी करुन घ्या, त्यामुळे आरोग्यविषयक समस्या सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखण्यात मदत होते.


हेही वाचा:


Health News: तुमच्याही लहान बाळाचे नेहमी पोट दुखते का? तर त्याला असू शकतो गॅस्ट्रोएन्टेरिटिस; पाहा...