Benefits of Garlic: लसूण (Garlic) आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सकाळी अनोखापोटी लसणाची पाकळी (Garlic Benefits) खाल्यानं शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. विशेषतः पोटाच्या समस्या म्हणजेच, गॅस, वाढलेलं वजन, अपचनाच्या समस्या यांसारख्या समस्या चुटकीसरशी दूर करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर ठरतो. पण आरोग्यदायी ठरणारा लसूण जर चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वेळी खाल्ला तर मात्र यामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 


अनोशापोटी लसूण खाण्याचा सल्ला का दिला जातो? 


अनोशापोटी लसूण खाल्यानं हाडांच्या आणि पोटाच्या समस्या चुटकीसरशी दूर होतात. अनोखा पोटी कच्चा लसूण खाल्यानं यौगिक एलिसिन (Allicin), कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच, लसणामध्ये रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लसूण शरीरात ब्लड फिल्टरेशनचंही काम करतो. पण लसूण अनोशापोटी खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. अनोशापोटी लसूण खाल्यानं अनेक समस्या दूर होतात. लसणात अँटिबायोटिक गुणधर्म असतात, अशातच जर अनोशापोटी लसणाचं सेवन केलं तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. शरीरात जर नुकसान करणारे बॅक्टेरिया अॅक्टिव्ह असतील, तर अशावेळी लसूण आपली जादू दाखवतो आणि त्या बॅक्टेरियाचा खात्मा करतो. 




सकाळी अनोशापोटी लसूण खाण्याचे फायदे 


सकाळी अनोशापोटी लसूण खाल्ल्यानं पचनक्रिया सुरळीत होते आणि अपचनाची समस्या दूर होते. यामुळे पोटातील घातक बॅक्टेरिया मरतात आणि पोटाचं आरोग्य सुधारतं. लसणात असणारे अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांचं दुखणंही कमी करतात. 




डिटॉक्सीफायर


लसणात अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. लसणातील हेच गुणधर्म सांधेदुखीवर रामबाण उपाय ठरतात. लसूण खाल्यानं ही समस्या कायमची दूर होऊ शकते. एवढंच नाहीतर लसूण इम्युनिटी बुस्टर म्हणूनही काम करतं. सर्दी, खोकल्यासोबतच लिव्हर फंक्शनच्या समस्या दूर करण्यासाठी लसूण मदत करतं. 


लसूण खाण्याची योग्य वेळ कोणती? 


ज्यांना अॅसिडीटी, गॅस आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या जाणवत असतील, तर अशा लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये. लसूण खाल्यानं रक्त पातळ होतं आणि त्यामुळे शरीराला अधिक फायदा होता. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Weight Loss Tips : सगळे म्हणतात, जिऱ्याचं पाणी प्या, वजन कमी होईल; पण खरंच असं होतं का?