Almonds Benefits: एखादी गोष्ट आपण विसरलो की, कोणी ना कोणी बदाम (Almond) खाण्याचा हमखास सल्ला देतं. बदामामध्ये भरपूर पोषकतत्व (Health Updates) असतात. एवढुसं दिसणारं बदाम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी (Almonds Are Very Beneficial For Health) ठरतं. तुमचं हृदय (Heart Health) निरोगी ठेवण्यासाठी बदाम अत्यंत फायदेशीर ठरतं. बदामात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. बदामात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. व्हिटॅमिन ई शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. जे एक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं. बदाम हे जगातील सर्वोत्तम व्हिटॅमिन ई स्त्रोतांपैकी एक आहे. जे एक अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं.


एका दिवसात किती बदाम खाऊ शकतं लहान मूल? 


हार्वर्ड टीएच चॅनच्या मते, व्हिटॅमिन ई एक अँटिऑक्सिडेंट व्हिटॅमिन आहे, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचं काम करते. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या धमन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी होतो. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, एका दिवसांत किती बदाम खावेत? किंवा लहान मुलांनी एका दिवसात किती बदाम खावेत? बदाम हे मुलांच्या पौष्टिक आहाराचा अविभाज्य भाग असले तरी, ओन्ली माय हेल्थच्या अहवालानुसार, लहान मूल एका दिवसात किती प्रमाणात बदाम खाऊ शकतं, हे मुलाच्या वयावर आणि त्याच्या एकूण आहारावर अवलंबून असतं. 


हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, लहान मुल किती बदाम खाऊ शकतं? 


1 ते 3 वर्षाचं मूल : दररोज 3 ते 4 बदाम 
4 ते 8 वर्षांचं मूल : दररोज  5 ते 8 बदाम 
9 ते 18 वर्षांचं मूल : दररोज  8 ते 10 बदाम 


युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर (USDA) च्या मते, बदाम हे प्रोटीन, व्हिटॅमिन ई, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा उत्तम स्रोत आहे. दरम्यान, बदाम कितीही आरोग्यदायी असलं तरीदेखील त्याचं मर्यादेपलिकडे सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानदायीही ठरू शकतं. त्यामुळे बदामाचं रोज सेवन करा, पण मर्यादेत करा. बदामात हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे वेगानं कॅलरी वाढतात. हे फॅट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु, नियमितपणे बदामाचं सेवन केल्यानं कॅलरीजमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. ज्यामुळे वजन वाढू शकतं. 




पचनासंबंधित समस्या


बदामामध्ये भरपूर फायबर असतं. बदाम साधारणपणे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. मात्र, जास्त प्रमाणात खाल्ल्यानं आतड्याला सूज येण्यासारख्या समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो.




निरोगी त्वचा 


त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यास बदाम फायदेशीर ठरतं. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ए मोठ्या प्रमाणावर असतं. व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. तर, व्हिटॅमिन ए त्वचेतील कोलेजन वाढविण्यास मदत करतं, ज्यामुळे त्वचा थंड आणि चमकदार होतं. 




डायबिटीजवर गुणकारी 


बदामामध्ये एक प्रकारचं विशेष प्रोटीन असंत, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतं. त्यामुळे मधुमेह असलेले लोक आपल्या रोजच्या आहारात बदामाचा समावेश करू शकतात.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Blood Pressure: ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स; फक्त बदला तुमच्या काही सवयी!