Vajan Kasa Kami Karal : मुंबई : वाढलेल्या वजनानं (Weight Gain) हैराण झालायत? काही केल्या वजन (Increased Weight) कमी होत नाहीये? आपल्यापैकी बरेचजण वाढलेल्या वजनाच्या (How To Reduce Weight) समस्येनं हैराण आहेत. अनियमित जीवनशैलीमुळे वाढलेल्या वजनाच्या समस्येनं सर्वचजण हैराण आहेत. शरीरातील फॅट (Body Fat) वाढतं आणि त्यासोबतच पोटाचा घेरही वाढतो. आजच्या काळात शरीरात फॅट वाढणं ही एक मोठी समस्या झाली आहे. पोटाची वाढलेली चरबी अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरते. 


बरेच लोक त्यांच्या वाढलेल्या पोटाचा आणि कंबरेचा घेर कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. जीम, झुम्बा आणि बाजारातील औषधं अशा अनेक गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. व्यायामापासून ते वजन कमी करण्याच्या डाएटपर्यंत सर्व गोष्टी आपण फॉलो करतात, पण तरीही फॅट काही कमी होण्याचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टी चमत्कार घडवू शकतात. त्यापैकी एक म्हणजे, जिरं (Know Cumin Benefits). वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे फायदे अनेकदा तज्ज्ञांकडून ऐकायला मिळतात. तसेच, वाढलेल्या वजनावर उपाय म्हणून जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला सर्रास दिला जातो. पण खरंच जिऱ्याचं पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं का? तर याचं उत्तर आहे, होय. वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरतं. 


वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी वरदान ठरतं. वजन कमी करण्यासोबतच जिऱ्याच्या पाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. मसाल्यांच्या पदार्थांमध्ये समाविष्ट होणारं जिरं, आरोग्याच्या समस्या चुटकीसरशी दूर करतं. पोटाची वाढलेली चरबी, शरीरातील फॅट्स, अपचनाच्या समस्या यांसारख्या अनेक समस्यांवर जिरं गुणकारी ठरतं. जर तुमच्याही पोटाचा घेर वाढला असेल आणि कमी करायचा असेल, तर जिऱ्याचं पाणी प्या आणि फरक पाहा. 




जिऱ्याचं पाणी वजन कसं कमी करतं? (How Can Cumin Water Reduce Weight?)


1. मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी फायदेशीर 


मेटाबॉलिज्म ही शरीरात होणारी एक महत्त्वपूर्ण क्रिया आहे. यातून सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलला जातो. शरीराला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज पडते. आणखी साध्या शब्दात सांगायचं तर मेटाबॉलिज्मने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वेगवेगळ्या पेशी तयार करण्यास मदत मिळते. हेच मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी जिऱ्याचं पाणी मदत करतं. मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होतात आणि यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते. 




2. पचनक्रिया सुधारते (Improves Digestion)


आपली पचनक्रिया व्यवस्थित असेल, तर शरीराच्या अर्ध्याहून अधिक समस्या दूर होतात, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. जिऱ्याचं पाणी पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करतं. अपचन झाल्यामुळे अनेकदा पोट फुगणं, पित्त यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जिऱ्याचं पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. 


3. डिटॉक्सिफिकेशनसाठी गुणकारी (Effective For Detoxification)


जिऱ्याच्या पाण्यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की, डिटॉक्सिफिकेशन वजन कमी करण्यात मदत करतं.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)