Collagen Rich Food for Skin Health : सुंदर त्वचा (Skin Care Tips) प्रत्येकालाच हवी असते. सध्या बाजारात सुंदर त्वचेसाठी अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहे. महागड्या क्रीम्सचा प्रचार करत सुंदर त्वचा मिळण्याचे दावे केले जातात. पण, हे दावे फोल ठरतात. तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी महागड्या क्रीम्स किंवा उत्पादनांची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त तुमच्या आहारात (Diet) बदल करुनही त्वचे संबंधित अनेक समस्या दूर करु शकता. तुम्ही आहारात कोलेजन (Collagen) युक्त अन्नपदार्थांचा समावेश केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होईल त्वचा सुंदर होण्यास मदत होईल.


Collagen Rich Diet : सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी तुम्ही आहारात कोलेजन युक्त पदार्थांचा समावेश नक्की करा.



  • जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवायची असेल, तर तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करणं खूप आवश्यक आहे. पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स, फोलेट भरपूर प्रमाणात असतात आणि ते तुमच्या त्वचेला हानिकारक आणि कोलेजन नष्ट करणाऱ्या सूर्यकिरणांपासून वाचवण्यास मदत करतात.

  • तुमच्या आहारात चिकन, मासे, बीन्स आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्यास तुमच्या शरीराला आवश्यक कोलेजन मिळेल. 

  • याशिवाय लिंबूवर्गीय फळांमधून तुमच्या शरीराला आवश्यक कोलेजन मुबलक प्रमाणात मिळेल. त्यामुळे आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश नक्की करा.

  • काजूमध्येही भरपूर प्रमाणात कोलेजन आढळते. तुम्ही नाश्नाच्या वेळी मूठभर काजू खाऊ शकता. यामध्ये जस्त आणि तांबे असतात, ज्यामुळे तुमच्या कोलेजनची पातळी वाढवण्यास मदत होते.

  • जांभूळ देखील तुमची कोलेजन पातळी वाढवण्यास देखील मदत करू शकतात. जांभूळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. रास्पबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरी यामध्येही तुम्हाला आवश्यक कोलेजन मिळेल

  • लसूण तुमचे जेवण चविष्ट बनवण्यासोबतच अतिशय आरोग्यदायी आहे. लसूण ॲलियम कुटुंबातील सदस्य असून यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढविण्यात मदत होते. लसणात असलेले सल्फर शरीरात कोलेजन वाढीस मदत करते.

  • तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करा. एक कप शिजवलेली किंवा कच्च्या ब्रोकोलीमधून व्हिटॅमिन सीचा संपूर्ण दिवसभरासाठीचा डोस देते, जे कोलेजन तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Best Diet Plan : वजन कमी करायचं मग 'हे' डाएट करून पाहा, व्हॉल्यूम डाएट काय आहे? माहितीय