Winter Health : ऋतुमानानुसार आपल्या आहारात (Health) बदल होत जातात. आता सगळीकडे थंडीचे गार वारे वाहतायत, त्यामुळे शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी ‌आपण गरम पदार्थांचे (Food) सेवन करतो. पण, काही थंड पदार्थ असे असतात जे वर्षाचे बाराही महिने आपल्याला खायला आवडतात. पण, असे पदार्थ आपण थंडीत खाऊ शकत नाहीत. हे पदार्थ नेमके कोणते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

  


आरोग्य तज्ञांच्या मते, आपण हिवाळ्यातही थंड पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो. हिवाळ्यात थंड पदार्थ खाताना फक्त त्याचे तापमान आणि प्रमाण यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यामुळे हिवाळ्यात आपले आरोग्य सदृढ राहते आणि आपल्या आवडत्या थंड पदार्थांचा आनंदही घेता येतो.


हिवाळ्यात थंड वातावरणामुळे तहान लागत नाही, त्यामुळे आपसूकच पाण्याचं सेवन कमी केलं जातं. जे आरोग्यासाठी घातक ठरतं. शरीरात पाण्याच्या अभावामुळे डिहायड्रेशन होते. हे डिहायड्रेशन टाळण्यासाठी आपण या थंड पदार्थांचे सेवन करू शकतो, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला ऊबही मिळते. तर थंडीमध्ये 'हे' थंड पदार्थ खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ते पाहूयात. 


ताक 




ताक प्यायल्याने पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. हिवाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय दुपारी ताक पिणे आरोग्यास उत्तम मानले जाते. त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात जर ताक पित असाल तर त्यात ओवा भाजून टाका. 


आईस्क्रीम




आईस्क्रीमचा गारेगारपणा आपल्याला हिवाळ्यातही हवाहवासा वाटतो. पण, हिवाळ्यात आईस्क्रीम खाताना आपण कचरतो. हिवाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने तणाव कमी होतो. 'आईस्क्रीम'मध्ये व्हिटॅमिन डी आढळते जे शरीरासाठी गरजेचं आहे. पण आईस्क्रीम खाताना स्वत:चं आरोग्य आणि प्रकृती पाहून खावं.


कोमट पाणी 





अतिथंड पाणी हिवाळ्यात आपल्या आरोग्यास नुकसान पोहोचवू शकतं. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाणी प्यावं. यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजंतवानं वाटतं.


दूध





थंड दूध प्यायल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात, त्यामुळे आपले वजन कमी होते. कोमट दूध प्यायल्याने झोपही शांत लागते. हिवाळ्यात व्यायामानंतर थंड दूध पिणे लाभदायी ठरते. तुम्हाला जेवल्यानंतर भूक लागत असेल तर थंड दूध प्यावं, त्यामुळे पोट भरलेलं राहतं. 


आवळ्याचा रस





आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात आवळ्याचा रस पिणे आरोग्यास फलदायी ठरते. आवळ्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. 


ऊसाचा रस 





हिवाळ्यात ऊसाचा रस प्यायल्याने थकवा दूर होतो. ऊसाचा रस प्यायल्याने झोपही चांगली लागते. ऊसाचा रस यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात हाडे मजबूत राहण्यासाठी ऊसाचा रस नक्की प्यावा. 


दही 





हिवाळ्यातदेखील तुम्हाला दही खावंसं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, दही खाण्यापूर्वी त्याचे तापमान सामान्य करा. थंडीमध्ये दुपारी दही खावे. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी दही उपयुक्त ठरते. दह्यामध्ये उच्च प्रथिने, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात.


लिंबू पाणी 





थंडीच्या वातावरणात कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे फायदेशीर ठरते. लिंबूमध्ये 'व्हिटॅमिन सी' मुबलक प्रमाणात असते, जे रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. हिवाळ्यात लिंबू पाणी सकाळी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक दूर होतात.


आपल्या आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी हिवाळा ऋतू, थंड हवामान आणि योग्य आहार हे तीन घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या बातम्या :


'या' गोष्टींच्या कमतरते उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका; नियंत्रित आणण्यासाठी 'हे' पदार्थ खा