Magical Home Remedies : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनाच आपण शरीराची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती (Immunity) कमी होऊन आपण अनेक आजारांना बळी पडतो. बदलत्या ऋतूतही आपल्याला अनेक आजारांचा धोका संभवतो. नेहमी औषधं घेतल्याने त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र यासाठी काही घरगुती आणि रामबाण उपाय आहेत. तुम्ही याचा उपयोग केल्यास तुम्हीही आजारांपासून दूर राहाल.
संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी आपण आजीबाईंच्या बटव्यातील उपाय वापरुन पाहायला हवा. आजीबाईंच्या बटवा म्हणजे घरगुती उपाय जे आपल्या आजींच्या पिढीपासून चालत आलेले आहेत. या उपायांमध्ये सर्दी-खोकल्यापासून ते अगदी जखम बरी करण्यापर्यंतचे सर्व रामबाण उपाय.
हे उपाय कोणते ते जाणून घ्या
1. इंस्टेंट कफ सिरप (Instant Cough Syrup)
बदलत्या मोसमात लहान मुलांसह मोठेही आजारी पडतात. या सर्दी-खोकल्यावर गुणकारी असा घरगुती उपाय आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात, तीन ते चार थेंब लिंबाचा रस, एक चमचा मध आणि चिमूटभर दालचिनीची पावडर मिसळा. हे मिश्रण तुमचा सर्दी आणि खोकला झटक्यात दूर करेल.
2. डार्क सर्कल्सपासून सुटका
तुमच्यापैकी बहुतेकांनी तुमच्या आजींना काळ्या वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या डोळ्याखाली बदामाचे तेल लावण्याचा सल्ला देताना पाहिले असेल. लहानपणी तुम्ही विचार केला असेल की तेलाचे काही थेंब ते काळे डाग कसे दूर करू शकतात. तर जेव्हा तुम्ही तारुण्यात पाऊल टाकले तेव्हा तुम्हाला त्याची जादू जाणवली आणि तोच उपाय तुम्ही स्वतःवर वापरला. फक्त 2-3 थेंब बदामाच्या तेलाचे डोळ्याखाली लावा आणि रात्रभर राहू द्या. तुम्ही फक्त 3-4 दिवसात त्या खोल गडद वर्तुळांचा निरोप घेऊ शकता.
3. मुरुमांपासून सुटका
सध्या बाजारात मुरुमावर उपाय म्हणून अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण काही वर्षांपूर्वी म्हणजे तुमच्या आजी तरुण असण्याच्या काळात असे कोणतेही प्रोडक्ट उपलब्ध नव्हते. तेव्हा लोक हा घरगुती उपाय करायचे. यासाठी 2 चमचे दही घ्या, त्यात अर्धा चमचा मध घाला आणि हे मिश्रण मास्क म्हणून चेहऱ्यावर लावा. आता ते धुवा आणि दोनदा पुन्हा करा.
4. सर्दी, खोकल्यासाठी रामबाण उपाय
लहान मुलं बदलत्या आजारात जास्त आजारी पडतात. अशा परिस्थितीत लहान मुलांना वारंवार बाजारातील औषधं देण्याऐवजी हा रामबाण उपाय करुन पाहा. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात जिरे, ठेचलेला गूळ आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा. हे दिवसातून दोन-तीन वेळा ते प्यायल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो.
5. सुंदर, रेशमी केसांसाठी घरगुती उपाय
जुन्या काळी आजसारखे वेगवेगळे प्रोडक्ट उपलब्ध नव्हते. त्यावेळी जुने लोक घरगुती उपाय करुनच केसांची काळजी घ्यायचे. तुम्हीही असं करु शकता, यासाठी खोबरेल तेल किंवा राईच तेल घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे तेल केसाला लावा. 30 ते 40 मिनिटे तसंच राहू द्या. यानंतर केस माईल्ड शॅम्पू वापरून कोमट पाण्याने धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :