Online Education Side Effects On Children : कोरोना काळात मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. या शिक्षणाचा मुलांना फायदा झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम देखील आता दिसू लागले आहेत. मोबाईलमध्ये गुंतून राहण्याची सवय जडल्याने यामुळे अनेक मुलांना दृष्टीदोष निर्माण झाल्याचं नेत्र तज्ञांच्या निदर्शास आले आहे. 


कोरोना काळात शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण सुरु केले. यामध्ये चांगलं यश देखील मिळालं. तसेच या निर्णयामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडला नाही. मात्र, ही सकारात्मक बाजू जरी असली तरी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे काही दुष्परिणाम देखील दिसू लागले आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत मुले सातत्याने मोबाईलमध्ये व्यस्त राहत असल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाला आहे. तसेच यामुळे मुलांच्या दृष्टीदोषात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक मुलांना जवळचे तर काहींना दूरचे दिसण्यास अडचण येत आहे. काहींच्या डोळ्यांतून पाणी येणे, जळजळ होणे अशा प्रकारच्या विकारात वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. 


जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील नेत्र तज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील (Dr. Dharmendra Patil) यांनी दुजोरा दिला असून शाळकरी मुलांच्या दृष्टीदोषामध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. यामध्ये 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या दृष्टीदोषामध्ये वाढ असली तरी वेळीच जर डॉक्टरांचा सल्ला घेतला किंवा नेत्र तपासणी केली तर हे दोष दूर करणे शक्य असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, सौम्य लक्षणे असल्यास दुर्लक्ष केल्यास या दोषात वाढ होऊन नोकरी व्यवयास करताना अडचण येऊ शकते. असा इशाराही डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिला आहे.    


महत्वाच्या बातम्या :