Marathwada Vaccination Update: 18 र्षांपुढील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्रांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे राज्यात शुक्रवारपासून याची सुरवातही झाली आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी लसीकरणासाठी पाठ फिरवली, त्यामुळे बूस्टर डोससाठी पात्र असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यात बुस्टरसाठी पैसे लागत असल्याने अनेकांनी लस घेण्याचे टाळले होते. हे सर्व लक्षात घेत केंद्राने अमृतमहोत्सवानिमित्ताने मोफत बूस्टर डोसची घोषणा केली आहे. तर एकट्या मराठवाड्यात 1 कोटी 33 लाख 75  हजार नागरिक बूस्टर डोससाठी पात्र असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात कितीजण बूस्टर डोससाठी पात्र 

अ.क्र. जिल्ह्याचे नाव  पात्र संख्या 
1 औरंगाबाद  12 लाख 97 हजार 304
2 बीड   8 लाख 85 हजार 805
3 हिंगोली  4 लाख 28 हजार 96
4 जालना  7 लाख 57 हजार 476
5 लातूर  8 लाख 52 हजार 742
6 नांदेड  11 लाख 13 हजार 696
7 उस्मानाबाद  5 लाख 57 हजार 759
8 परभणी  7 लाख 48 हजार 224
एकूण    1 कोटी 33 लाख 75 हजार 102

आता सहा महिन्यातच बूस्टर...

यापूर्वी कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर तिसरा डोस घेण्यासाठी 9 महिन्यांचा कालवधी लागायचा. मात्र आता हा कालवधी आता कमी करून 6 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे सहाजिकच पात्र नागरिकांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यामुळे पुढील 75 दिवसांत नागरिकांना बूस्टर डोस मोफत मिळणार आहे.