Hips and Thighs Weight Loss Exercise : वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही जण वजन कमी करण्यासाठी डायटींग तर काही जण व्यायामाची मदत घेतात. मात्र हे सर्व उपाय सर्व लोकांसाठी समानपणे उपयोगी ठरतीलच असं नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. योगा तणाव कमी करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठीही मदत करतो. याशिवाय योगामुळे वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त आहे. योगामुळे शरीराती कॅलरी जाळण्यास मदत होते आणि स्नायूही मजबूत होतात. योगा केल्याने शरीर तंदुरुस्त तर राहतेच शिवाय तुमच्या शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.


अनेक जणांना लठ्ठपणाची समस्या उद्भवते. सध्याच्या व्यस्त लाईफस्टाईलमुळे आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पोट, ओटीपोट आणि मांड्या या भागात अतिरिक्त चरबी वाढते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, वय, हार्मोन्स, आनुवंशिकता यामुळे चरबी वाढणं सामान्य आहे. पण या चरबीपासून वेळीच सुटका मिळवणं गरजेच आहे. यासाठी तुम्ही खाली दिलेली योगासनं करुन तुमचं वजन नियंत्रित होण्यास मदत होईल.


उत्कटासन (Utkatasana)


उत्कटासनाला चेअर पोज असेही म्हणतात. हे आसन पाय, पृष्ठभाग आणि मांड्या यांच्या स्नायूंवर काम करते. पायात थोडे अंतर घेऊन ताठ उभे राहा.
तळहात जमिनीकडे असतील अश्या रीतीने हात खांद्याच्या रेषेत वर उचला. हात कोपरात वाकवू नका. गुडघे वाकवून आपले ओटीपोटात वाका. आपण एका खुर्चीत बसलो आहोत, अशी कल्पना करा. तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रीत करा. काही वेळ या स्थिती राहिल्यानंतर सरळ उभे राहा.


(PC : unsplash.com)


जानूशीर्षासन (Janu Sirsasana)


जानू शीर्षासनमुळे लवचिकता वाढण्याबरोबरच शरीराचा पृष्ठभाग आणि मांडीचे सांधे मजबूत होतात. हे आसन करण्यासाठी समोरच्या जमिनीवर बसा. दिशेने पाय पसरवा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्या. उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीजवळ ठेवा. श्वास घ्या, श्वास सोडताना पुढच्या बाजूने वाकत डाव्या पायाच्या तळव्याला स्पर्श करा. थोडा वेळ या स्थितीत थांबा. आता दुसऱ्या बाजूने हे आसन करा.



(PC : unsplash.com)


नटराजासन (Natarajasana)


या आसनामुळे मध्ये मांडीच्या आतील आणि बाहेरील भागाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. यामुळे तुमच्या ओटीपोटापासून ते तुमच्या पायापर्यंत, पायाच्या प्रत्येक स्नायूंना टोन्ड होतात. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहा. उजवा पाय मागे वाकवा आणि डाव्या हाताने पायाच्या घोट्याने धरा. पाय शक्य तितक्या उंच नेण्याचा प्रयत्न करा. आपला उजवा हात सरळ समोर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि शरीर संतुलित करण्याचा प्रयत्न करा. काही काळ या स्थितीत राहा. त्यानंतर सरळ स्थितीत या आणि दुसऱ्या हाताने आणि पायाने हे आसन करा.



(PC : unsplash.com)


विरभद्रासन (Virbhadrasana)


या आसनाला योद्धा पोझ असेही म्हणतात. याचा परिणाम क्वचितच मांड्यांवर होतो. हे आसन करण्यासाठी पायांमध्ये साधारण 3-4 फुटाचे अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही हात पसरवा. हाताचे तळवे वरच्या बाजूला ठेवा. डोकं आणि उजवा पाय उजवीकडे नेत दुसऱ्या पायाचा गुडघा काटकोनात दुमडा. थोडा वेळ याच स्थितीत राहा. नंतर श्वास घेत पुन्हा सरळ उभे राहा. आता हेच आसन डाव्या बाजूने करा.



(PC : unsplash.com)


उपविष्ठ कोणासन (Upavistha Konasana)


हे आसन मांड्याचे स्नायू मजबूत करत ताकद आणि लवचिकता देखील वाढवते. पाय आपले समोरच्या बाजूला पसरवा. यानंतर तुमचे तळवे मध्यभागी आणा. आता पाय हाताच्या बाजूला शक्य तितक्या लांब पसरवा. तुमच्या शरीराच्या पुढच्या बाजूने वाका. तुमची हनुवटी आणि डोके जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. 



(PC : unsplash.com)