Health Tips : शरीराच्या सर्वात महत्वाच्या इंद्रियांपैकी एक म्हणजे डोळे. डोळ्यांची योग्य काळजी घेणं फारच गरजेचं आहे, नाहीतर तुमची दृष्टी कमकुवत होऊ लागते. सध्या, स्क्रीन टाईममध्ये वाढ झाल्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर खोलवर परिणाम झाला आहे. दिवसभर लॅपटॉप किंवा मोबाईल वापरल्याने डोळ्यांत दुखणे, पाणी येणे, डोळे लाल होणे किंवा अंधुक दिसणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. यासाठी डोळ्यांची विशेष काळजी घ्या.
अंधुक दिसल्या कारणाने जर तुम्हाला चष्मा लागला असेल तर यासाठी तुम्ही काही योगासनं करू शकतात. योगाभ्यास केल्याने डोळ्यांची दृष्टी तेजस्वी होते.
हलासन :
हलासनाचा सराव डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. या योगामुळे वजनही नियंत्रित राहते. शरीराला शक्ती मिळते. हलासनाचा सराव करण्यासाठी आधी पाठीवर झोपावे. श्वास घेताना, पाय वरच्या दिशेने उचलून डोक्याच्या मागे घ्या. अंगठ्याने जमिनीला स्पर्श करून हात जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबर जमिनीला घट्ट ठेवा. काही वेळ या स्थितीत रहा आणि नंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या.
चक्रासन :
या योगामुळे कंबर मजबूत होते. दृष्टी सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. पचनाच्या विकारांपासून आराम मिळवण्यासाठी चक्रासनचा सरावही फायदेशीर आहे. चक्रासनाचा सराव करण्यासाठी, जमिनीवर तुमच्या पाठीवर झोपा, तुमचे गुडघे वाकवा आणि टाच शक्य तितक्या नितंबाजवळ आणा. आपले हात कानाकडे वाढवा आणि आपले तळवे जमिनीवर ठेवा. पाय तसेच तळवे वापरून शरीराला वर उचला. खांद्याला समांतर पाय उघडताना वजन समान प्रमाणात वितरीत करून शरीराला वर खेचा. 30 सेकंद या आसनात राहा.
उष्ट्रासन :
हे आसन उंटाच्या मुद्रेत बसून केले जाते. योग तज्ञाच्या देखरेखीखाली उस्त्रासन करा. याचा सराव केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. शरीराची लवचिकता सुधारते, थकवा दूर करते आणि दृष्टी सुधारते. यासाठी सर्वात आधी गुडघ्यावर बसा आणि श्वास घेताना मणक्याचा खालचा भाग पुढे दाबा. या दरम्यान, नाभीवर पूर्ण दाब जाणवला पाहिजे. पाठीमागे वाकताना पाठ वाकवा आणि मान सैल सोडा. 30 ते 60 सेकंद या स्थितीत रहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :