Weight Loss Tips : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, वाढत्या वजनामुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून वजन नियंत्रित ठेवता (Weight Loss) येते. वजन नियंत्रित करण्यासाठी, तुम्ही 30-30-30 नियम देखील फॉलो करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे 30-30-30 नियम आणि वजन कमी करण्यासाठी याचा कसा उपयोग होतो.
कॅलरीज बर्न करा
वजन कमी करण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅलरी नियंत्रित करणे. कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलू शकता. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात 30 टक्के कॅलरी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले तर तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पाणीयुक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.
अन्न हळूहळू चावा
अन्न खाणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते व्यवस्थित चावणेही महत्त्वाचे आहे. अन्न चघळल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. जेवताना अन्नाचा योग्य आस्वाद घ्या. आणि हळूहळू अन्नाचं सेवन करा. म्हणजे तुम्ही अन्नावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि त्याचा आनंद घेऊ शकाल.
बरेच लोक जेवताना टीव्ही पाहतात किंवा फोन वापरतात. या सर्व सवयींचा आरोग्यावर परिणाम होतो. खरंतर अन्न कधीही घाईने खाऊ नये. दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा नाश्त्यासाठी आवर्जून वेळ काढा. अन्न हळूहळू चघळल्याने अन्न सहज पचते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी, नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी, तुम्ही दररोज 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमितपणे शारीरिक हालचाली केल्याने केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. तुम्ही दररोज 30 मिनिटे जॉगिंग, पोहणे, सायकलिंग इत्यादी करू शकता, ज्यामुळे तुम्ही फिट राहाल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर हे नियम फॉलो केले तर तुमचं वजन काही दिवसांतच कमी होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :