Skin Care Tips : सुंदर आणि ग्लो करणारी स्किन (Skin Care Tips) हे प्रत्येकाचं स्वप्न असते. आजच्या धावपळीच्या जीवनात सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. ज्यासाठी आपण दर महिन्याला पार्लरमध्ये इतके पैसे वाया घालवतो, पण त्याचा परिणाम दोन-चार दिवसांनी निघून जातो. अनेकदा बाजारात उपलब्ध असलेले ब्युटी प्रोडक्ट्स आपल्यासाठी फायदेशीर नसतात, अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपायांची आपण मदत घेऊ शकतो.


या घरगुती उपायांच्या मदतीने तुमचे पैसे तर वाचतीलच पण तुमचा वेळही वाया जाणार नाही. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला ग्रीन टीचे काही फेस पॅक या संदर्भात माहिती देणार आहोत. वजन कमी करण्याबरोबरच ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल तर तुम्ही घरच्या घरी ग्रीन टी फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावू शकता.


ग्रीन टी फेस पॅक बनवण्याच्या पद्धती :


मुलतानी माती आणि ग्रीन टी फेस पॅक


तेलकट त्वचा असलेल्यांसाठी मल्टी क्ले खूप फायदेशीर आहे. यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये 2 चमचे ग्रीन टी टाकून पेस्ट बनवा. जाड गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यावर, ती चेहऱ्यावर लावा आणि किमान 15 ते 20 मिनिटे राहू द्या. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.


संत्र्याची साल आणि ग्रीन टी फेस पॅक


उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी संत्र्याची साल वापरता येते. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही त्यांना वाळवू शकता आणि पावडर स्वरूपात ठेवू शकता. जे बराच काळ तुम्ही वापरू शकता. या फेस पॅकसाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि अर्धा चमचा मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर साधारण 15 मिनिटे लावा. कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा.


लिंबू आणि ग्रीन टी पॅक


लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. एक चमचा ग्रीन टीच्या पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्याला लावा. हा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यास विसरू नका. हा पॅक साधारण 10 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा