Health Tips : निरोगी राहण्यासाठी केवळ बाह्य स्वच्छता पुरेशी नाही, त्यासाठी वेळोवेळी शरीर आतून डिटॉक्स करणे देखील आवश्यक आहे. या प्रक्रियेत शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे शरीराचे सर्व अवयव निरोगी राहतात. 


आपण जे काही खातो ते काही वेळाने मलमार्गे शरीराबाहेर जाते. पण, त्याचा काही भाग आपल्या शरीरात राहतो. यामुळेच आपल्याला वेळोवेळी आपले शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. डिटॉक्सिफिकेशनमुळे शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आणि तंदुरुस्त राहतो. यासाठी तुम्हाला कोणतीही मेहनत करण्याची गरज नाही. याऊलट, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करून तुमचे शरीर डिटॉक्स करू शकता. तुमच्या जीवनशैलीत या गोष्टींचा समावेश करून तुम्ही नैसर्गिक मार्गाने तुमचे शरीर डिटॉक्स करू शकता.


पुरेसे पाणी प्या


शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी प्यायल्याने हानिकारक विषारी पदार्थ किडनीद्वारे बाहेर टाकले जातात आणि शरीरात साचून कोणताही धोका निर्माण होत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते आणि पचनक्रियाही निरोगी राहते. चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.


लिंबाचा आहारात समावेश करा


तुमच्या आहारात लिंबाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समावेश करा. शरीरातील डिटॉक्सिफिकेशनसाठी लिंबू सर्वात महत्वाचे मानले जाते. ते व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात जे आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करतात. याच्या रोजच्या वापराने चेहऱ्यावरील डागही दूर होऊ लागतात. शरीराची पीएच पातळी राखण्यासाठी लिंबूवर्गीय फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी, तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबाचा रस कोमट पाण्यात टाकून पिऊ शकता. 


फायबर समृद्ध असलेल्या गोष्टी खा


तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी रोज फायबर युक्त गोष्टी खाव्यात. यामुळे त्यांना मल पास करणे सोपे होईल. फायबरसाठी हिरव्या पालेभाज्या खाव्यात. या भाज्या नैसर्गिक पद्धतीने तुमचे शरीर डिटॉक्स करतात आणि पचन सुधारतात.


बॉडी डिटॉक्सचे फायदे


1. डिटॉक्सिंगमुळे त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहते.


2. शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात त्यामुळे सूज येण्याची समस्या होत नाही.


3. चयापचय वाढतो आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.


4. वाढत्या कोलेस्ट्रॉलवरही नियंत्रण ठेवू शकता.


5. किडनी, यकृत आणि पोटाच्या आजारांपासून संरक्षण.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी गरजेचा 'Digital Detox' आहे तरी काय? वाचा याचे भन्नाट फायदे