Animal Ott Release: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट  2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  अखेर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. जे लोक हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकले नाही ते आता हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकणार आहेत.  नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. पण सध्या सोशल मीडियावर नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. 'अॅनिमल' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर नेटकरी का नाराज झाले? जाणून घेऊयात...


नेटकरी का नाराज झाले?


दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगानं सांगितलं होतं  की, अॅनिमल या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजमध्ये आणखी तीन मिनिटे जोडली जातील. पण चित्रपटाच्या ओटीटी रिलीजमध्ये तीन मिनिटे जोडलेली नाहीयेत.  


रणबीर कपूरचा दमदार अभिनय, संदीप रेड्डी वंगाची कथा मांडण्याची शैली, संगीत आणि चित्रपटातील अप्रतिम बीजीएम यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. या सगळ्या दरम्यान, अनेकांना आशा होती की 'ॲनिमल' ओटीटीवर  एक्स्टेंडेड कट प्रदर्शित होईल. मात्र, तसे न झाल्याने नेटकरी निराश झाले आहेत.


नेटकऱ्यांनी शेअर केलं ट्वीट


 'ॲनिमल'  चित्रपटातील कट करण्यात आलेली तीन मिनिटांचे सीन्स ओटीटी रिलीजमध्ये अॅड करण्यात येणार होते म्हणून चाहते खूप उत्सुक होते. पण, जेव्हा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला तेव्हा चाहत्यांची निराशा झाली. कारण थिएटर रिलीजमध्ये कट करण्यात आलेले सीन्स ओटीटीवर रिलीज करण्यात आले नाहीत. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'Netflix वर नुकतेच अॅनिमल पुन्हा पूर्ण पाहिला परंतु कोणतेही एक्सटेंडेड व्हर्जन चित्रपटा नाहीये.' तर दुसऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, अॅनिमलचा एक्सटेंडेट व्हर्जन ओटीटीवर नाहीये, फक्त थिएटरीकल व्हर्जन आहे'














 'ॲनिमल' या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


OTT Release This Week : रणबीर कपूरचा 'Animal' ते विकी कौशलचा 'सॅम बहादुर'; 'या' आठवड्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी