What Is Digital Detox : इंटरनेट (Internet) हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपण सगळेच इंटरनेटवर इतके अवलंबून आहोत की यापासून दूर होण्याचा आपण विचारच करू शकत नाही. सकाळपासून ते रात्रीपर्यंत 24 तास आपल्या हातात मोबाईल (Mobile) असतो. पण तुमच्या या सवयीचा तुमच्या जीवनशैलीवर (lifestyle) काय परिणाम होत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशा वेळी अनेकजण डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) ही संकल्पना लक्षात येते. पण, नेमका हा प्रकार आहे तरी काय? शिवाय याचा शरीराला नेमका कसा फायदा होतो? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


'डिजिटल डिटॉक्स' म्हणजे काय?


अनेकदा आपण बॉडी डिटॉक्स हा शब्द ऐकला असेल. डिजिटल डिटॉक्स हा देखील असाच एक प्रकार आहे ज्यामध्ये ठराविक काळासाठी मोबाईल, लॅपटॉप, संगणक या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून काही काळासाठी दूर राहणे. या प्रक्रियेला डिजिटल डिटॉक्स म्हणतात. ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतो अगदी त्याचप्रमाणे इंटरनेटवर सतत अॅक्टिव्ह राहणे हे देखील आपल्यासाठी घातक आहे. 


डिजिटल डिटॉक्स काळाची गरज...


आज मोबाईल, इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या इतकी झपाट्याने वाढलीय की यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत चालला आहे. अशा वेळी मोबाईलवरून काही काळ ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. याचे आणखी फायदे कोणते ते जाणून घेऊयात. 


सेल्फ ग्रुमिंगसाठी फायदेशीर


इंटरनेटच्या वापरात आजकाल पण इतके गुंतून गेलो आहोत की आपण आपल्या शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याकडेही दुर्लक्ष करत चाललो आहोत. जास्त वेळ स्क्रीनवर राहिल्याने डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही डिजिटल डिटॉक्सची मदत घेतली तर तुम्ही स्वतःला जास्त वेळ देऊ शकाल. तसेच, तुमच्या आवडते छंद आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रिक करू शकाल. 


मानसिक आरोग्यासाठी गरजेचं 


चांगल्या मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. डिजिटल गॅजेट्सच्या अति वापराने त्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. अशा वेळी रात्री झोपताना मोबाईल, संगणक, टिव्हीपासून दूर राहून पुरेशी झोप घ्या. हे केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही गरजेचं आहे.


शरीराला ऊर्जा मिळते 


इंटरनेटच्या वापराने आपली अनेक कामे जरी सोपी होत असली तरी मात्र आपण आळशी होत चाललो आहोत. आपण अनेक कामे एकाच जागेवर बसून करत असल्याने शरीराची हालचाल होत नाही. आणि त्यामुळे शरीर सुस्त होत जाते. यासाठीच काही काळ या इलेकट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर राहिल्याने आपली शारीरिक हालचाल तर होतेच शिवाय शरीराला ऊर्जा देखील मिळते.   


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' व्हिटॅमिनची कमतरता आईच्या दुधानेही भरून काढता येत नाही? नवजात बाळासाठी 'हे' व्हिटॅमिन गरजेचं