Mobile Wallpaper : आजकाल केवळ मोबाईलचा वॉलपेपर पाहूनच एखाद्याचं व्यक्तिमत्त्व ओळखता येतं. तसं पाहिलं तर, आजकाल स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे मोबाईलचा वॉलपेपर सेट करण्याचा ट्रेंडच आला आहे. स्वत:वर प्रेम करणारे लोक स्वत:चा फोटो वॉलपेपरवर ठेवतात, तर काही जण त्यांच्या धंदाशी संबंधित फोटो, तर काही जण देवाचे फोटो वॉलपेपरला ठेवतात. आता हे वॉलपेपर केवळ माणसाचे व्यक्तिमत्त्व सांगत नाहीत, तर माणसाच्या प्रगतीचे कारण देखील ठरतात. कसे? जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, काही वॉलपेपर हे माणसाच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असतात. प्रत्येक ग्रहाचं एक ठराविक चिन्ह असतं, ज्याच्या मदतीने व्यक्तीच्या जीवनातील कष्ट दूर होऊ शकतात. सतत सकारात्मक गोष्ट समोर दिसल्याने किंवा फोन वापरताना डोळ्यासमोर आल्याने आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि जीवनात चांगले बदल घडू लागतात.
हा वॉलपेपर ठेवल्यास मिळेल मेहनतीचं फळ
जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या वॉलपेपरवर पायऱ्या चढत असलेल्या व्यक्तीचा फोटो ठेवला तर त्याला त्याच्या मेहनतीनुसार त्याच्या कामाचं फळ मिळू लागेल, यश मिळू लागेल. यासोबतच तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होतील. हा फोटो सतत डोळ्यासमोर राहिल्याने तुमची प्रगती होईल आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा देखील संचारेल.
या वॉलपेपरमुळे मिळेल मानसिक शांती
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची सतत काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तणाव असेल, तर तुमच्या मोबाईल वॉलपेपरवर पावसाचे थेंब किंवा योगासनांचा फोटो ठेवा. असं केल्याने तुमचं मन तर शांत होईलच, पण तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करण्यासही मदत होईल. सतत विचार करुन तुम्ही कंटाळला असाल तर वॉलपेपरवर पावसाचा फोटो ठेवून बघा.
लवकरच बनतील लग्नाचे योग
जर तुम्ही बऱ्याच काळापासून लग्नासाठी एखादं स्थळ शोधत असाल आणि तुमचं लग्न जुळत नसेल तर चिंता करू नका. वास्तुशास्त्रानुसार, मोबाईल वॉलपेपरवर गुलाबाच्या फुलाचा फोटो लावा. वास्तविक, गुलाबाचे फूल शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा वैवाहिक जीवनाचा कारक आहे. त्यामुळे मोबाईलच्या वॉलपेपरवर गुलाबाचे फूल ठेवल्याने विवाहात येणारा कोणताही अडथळा दूर होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: