Health Tips : तुमच्या शारीरिक स्वस्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. स्वत: ची जाणीव असणे म्हणजे आत्म्याचे विविध पैलू, जागरुकता, वर्तणूक आणि भावना यासह जागरुक असणे. याचाच संबंध तुमच्या मानसिक स्वास्थ्याशीदेखील येतो. मूलत: ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
जागरूकता म्हणजे काय?
जागरूकता म्हणजे आपण कुठे आहोत काय करतो आहोत याबाबत सतत सतर्क राहणे म्हणजेच जागरूक असणे. यामुळे तुमच्या विचारांना, तुमच्या भावनांना चालना मिळते. तसेच यामुळे तुमच्या कामावरही तुमचे मानसिक नियंत्रण राखण्यास मदत होते. तुम्ही अधिक कार्यक्षम होतात.
नेहमी हे लक्षात ठेवा
तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुमच्या कृतीतून ही जागरूकता दाखवू शकता. उदा..तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याकडे योग्य लक्ष दिल्यास तुमच्या तब्येतीवरही त्याचे बदल दिसून येतात. म्हणजेच, तुम्हाला किती भूक लागली आहे? त्यानुसार तुमच्या ताटात किती अन्न असायला हवे? तसेच त्या अन्नपदार्थांमधून तुमच्या शरीराला किती पोषक घटक मिळतायत? याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
जागरूकता आणि ध्यान :
तुमच्या मेंदूवर ताबा मिळविण्यासाठी तसेच तुमच्या मेंदूला जागरूक ठेवण्यासाठी ध्यान ही एक सर्वोत्तम पद्धत आहे. या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा यांनी पायांच्या तळव्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी काही टीप्स दिल्या आहेत.
ध्यान करण्याचे 8 फायदे :
1. वर्तमानात फोकस करण्यासाठी
2. आत्म-जागरूकता वाढविण्यासाठी
3. तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी
4. नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करण्यासाठी
5. संयम वाढविण्यासाठी
6. रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राखण्यासाठी
7. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी
ध्यान कसे करावे? काही सोप्या टिप्स...
शांत ठिकाणी बसून ध्यान करा :
ध्यान करण्यासाठी सर्वात आधी शांत जागा निवडा. ज्या ठिकाणी मोबाईल नसेल, टिव्हीचा आवाज नसेल, तसेच कोणताही गोंधळ नसेल अशी शांत जागा निवडा आणि ध्यान करा.
श्वासावर लक्ष केंद्रित करा :
तुम्ही श्वास घेताना आणि श्वास सोडताना त्यावर नीट लक्ष केंद्रित करा. योग करत असताना तुमचे श्वासावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे.
तुम्ही किती वेळ योग करावा?
अनेक अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, ध्यानासाठी साधारणत: दिवसातून 20 मिनिटं पुरेशी आहेत. पण त्याचबरोबर त्यामध्ये सातत्य तसेच प्रामाणिकपणा देखील असणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :