Health Tips : तुम्हाला जर वारंवार होणारी केसगळती (Hairfall), केस तुटणे यांसारख्या केसांशी संबंधित समस्या टाळायच्या असतील तर तुमच्या शरीरात बायोटिनची कमतरता आहे असं समजा. शरीरातील ही बायोटिनची (Biotin) समस्या भरून काढण्यासाठी त्वचेची आणि नखांची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही आहारात बायोटिन युक्त पदार्थांचा समावेश करा. शरीरातील बायोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
या संदर्भात वरिष्ठ सल्लागार, अंतर्गत औषध, नारायण हॉस्पिटल गुरुग्राम येथील डॉ. पंकज वर्मा म्हणतात की, बायोटिनला व्हिटॅमिन एच (Vitamin H) देखील म्हणतात. व्हिटॅमिन एच म्हणजेच बायोटिन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. पायल रोहतगी सांगतात की, बायोटिन हे विरघळणारे जीवनसत्व आहे आणि शरीराच्या योग्य कार्यासाठी ते खूप महत्वाचे आहे.
बायोटिन महत्वाचे का आहे?
डॉ. पंकज वर्मा म्हणतात की, बायोटिन हे आपल्या त्वचेसाठी, नखांसाठी आणि केसांचं आरोग्य नीट राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण ते कोलेजन तयार करण्यास मदत करतात. बायोटिनमुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. याशिवाय बायोटीन न्यूरोनल फंक्शनला चालना देते आणि शरीरातील पेशींच्या योग्य विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त
अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. पायल रोहतगी सांगतात की, काही संशोधनानुसार बायोटिन हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. हे इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. शरीरातील पेशींच्या वाढीसाठी बायोटिन देखील फार गरजेचं आहे. ज्यामुळे शरीरातील ऊती आणि अवयव निरोगी राहतात. जर तुम्हाला लांबलचक आणि घनदाट केस हवे असतील तर बायोटिनचा आहारात नक्की समावेश करा.
'या' पदार्थांचं सेवन करा
याबरोबरच, तुम्ही 6 महिन्यांपर्यंत दररोज 300 मिलीग्राम बायोटिन घेऊ शकता. तसेच, जर तुम्हाला नियमित बायोटिनचं सेवन करायचं असेल तर दररोज साधारण 2.5 मिलीग्रामचा डोस सुरक्षित मानला जातो. बायोटिनसाठी, तुम्ही तुमच्या आहारात बिया, नट्स, अंडी, मांस आणि भाज्यांचा समावेश करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : 'या' पदार्थांतून शरीराला मिळतात हेल्दी फॅट; वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त