Attack on ED : पश्चिमबंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर (सक्तवसुली संचनालय) स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीची टीम (Enforcement Directorate) रेशन घोटाळ्यात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या निवासस्थानावर धाड टाकण्यासाठी निघाली होती. तेव्हा हा हल्ला करण्यात आलाय. शाहजहान शेख (Shahjahan Sheikh) असे या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखाली या भागात शुक्रवारी (दि.5) ही घटना घडली. 


अधिकची माहिती अशी की, धाड टाकण्यासाठी निघालेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर आणि जवानांवर स्थानिकांनी जोरदार हल्ला केला. हल्ला करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 100 इतकी होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळपासून 15 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. 


वाहनांच्या काचा फोडल्या 


ईडी अधिकाऱ्यांना (Enforcement Directorate) आणि जवांनाना जमावाने चांगलेच घेरले. त्यांच्या वाहनांच्या काचा देखील त्यांनी फोडून टाकल्या होत्या. जमावाचा रोष पाहता ईडी अधिकाऱ्यांनी (Enforcement Directorate) तेथून परतण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान एका युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ईडीची टीम टीमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर धाड टाकण्यासाठी पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्यांचा समर्थकांकडूनच हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 


कोण आहेत शाहजहान शेख? (Shahjahan Sheikh)


तृणमूल काँग्रेसमध्ये सक्रीय असलेले शाहजहान शेख (Shahjahan Sheikh) अनेक वर्षांपासून रेशन डिलरचे काम करत आहेत. ते पश्चिम बंगाल सरकारमधील माजी मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक (Jyotipriya Mallick) यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. धाड टाकल्यानंतर रेशन घोटाळ्याबाबत अनेक कागदपत्र मिळू शकतात, असा दावा ईडीने केला आहे. हल्ला झाल्यानंतर ईडीने कारवाई थांबवत मागे हटण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान ईडी पश्चिम बंगालमध्ये अनेक कारवाया करणार आहे. रेशन घोटाळाही लवकरच उघड होईल, असेही ईडीने (Enforcement Directorate) स्पष्ट केलंय. 


ज्योतीप्रिय मल्लिक यांच्या घरावरही ईडीची धाड 


रेशन घोटाळ्याप्रकरणी सर्वप्रथम ईडीने (Enforcement Directorate) माजी मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते ज्यातिप्रिय मलिक (Jyotipriya Mallick) यांच्या घरावर धाड टाकली. सध्या त्यांच्याकडे वनमंत्रीपदाचा कार्यभार आहे. यापूर्वी ईडीने तांदळाच्या मिलचे मालक बकीबूर रहेमान यांना अटक केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Bharat Jodo Nyay Yatra : 15 राज्यं पण सर्वाधिक फोकस उत्तर प्रदेशात अन् शेवट निर्णायक महाराष्ट्रात! लोकसभेला काँग्रेसचा 'न्याय' फलदायी होणार?