Makar sankranti 2024 : प्रत्येक ऋतूनुसार आपण आपल्या जीवनशैलीत (Lifestyle), आहारात (Food), पेहरावात बदल करतो. हिवाळ्यात (Winter Season) देखील थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण उबदार कपडे परिधान करतो त्याचबरोबर गरम पदार्थांचं सेवन करतो. या ऋतूत  तिळाचे लाडू, बाजरी, भुईमुगाच्या शेंगा आणि अनेक गरम पदार्थांचं सेवन केलं जातं. यामुळे थंडीपासून आपला बचाव तर होतोच पण शरीरही उबदार राहण्यास मदत होते. 


मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2024) सण देखील काही दिवसांवर आला आहे. अशातच घराघरांत तिळाचे लाडू, तिळाची चिक्की अशा अनेक खमंग पदार्थ बनविण्याची तयारी सुरु झाली असेल. पण, या गरम पदार्थांच्या अति सेवनाने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला तर मग या ठिकाणी आपण गरम पदार्थांच्या सेवनाने शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


गरम पदार्थांचं सेवन करणे 


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तसं पाहायला गेलं तर, गरम पदार्थांच्या सेवनाने आपल्या शरीरावर जास्त नुकसान होत नाही. पण, ज्या लोकांना गरम पदार्थांची एॅलर्जी आहे अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गरम पदार्थांचं सेवन करावं. कारण, यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, गरम पदार्थांचं सेवन करावं पण ते मर्यादित प्रमाणातच करावं असा देखील सल्ला डॉक्टर देतात. 


त्वचेवर पुरळ उठणे 


बहुतेक लोकांना गरम पदार्थ सूट होत नाहीत. अशा लोकांना गरम पदार्थांच्या सेवनाने शरीरावर खाज येते, सूज येते तसेच अंगावर पुरळ उठतात. जर, तुम्हालाही गरम पदार्थांच्या सेवनाने शरीरावर हे बदल दिसत असतील तर वेळीच अशा पदार्थांचं सेवन करणं टाळा. 


लघवी करताना जळजळ होणे 


तुम्ही जर शरीराला उबदार ठेवण्यासाठी जर गरम पदार्थांचं सेवन करत असाल तर तुम्हाला लघवी करताना जळजळ निर्माण होऊ शकते. तसेच, यामुळे तुम्हाला इन्फेक्शन तसेच अन्य समस्याही उद्भवू शकतात. तसेच, जर तुम्हाला गरम पदार्थांच्या सेवनाने तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची एॅलर्जी झाल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Winter Health Tips : हिवाळ्यात आजारांपासूनही दूर राहाल आणि रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल; फक्त 'या' भाज्यांचा आहारात समावेश करा