Health Tips : आपल्या सर्वांना फिट राहायचं असतं. यासाठी अनेकजण अनेक प्रकारे प्रयत्न करतात. काही लोक व्यायाम करतात तर काही हेल्दी आहारातून (Food) फॅट बर्न करत असतात. हेल्दी फॅट आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात. यामुळे शरीराला कोणतेच नुकसान होत नाही. याशिवाय या हेल्दी फॅटमधून आपल्याला प्रोटीन (Protein) आणि कार्ब्स मिळतात. याबरोबरच शरीरात जीवनसत्त्वे (Vitamins) चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास आणि हृदय आणि मेंदूला निरोगी ठेवण्यातही हेल्दी फॅट फार उपयुक्त ठरतात.
खरंतर, ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स आरोग्यासाठी चांगले नाहीत. शरीरात फॅटच्या जास्त प्रमाणामुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेज येते. लठ्ठपणा वाढतो. पण, हेल्दी फॅट्स आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहेत. यामुळे तुमचे वजन आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय थकवा आणि आळस दूर होऊन दिवसभर तुमचा मूडही चांगला राहतो.
शाकाहारी लोकांसाठी काही ऑप्शन्स
डार्क चॉकलेट
फॅट बर्न करण्यासाठी डार्क चॉकलेट हा आणखी एक चांगला पर्याय आहे. पण, डार्क चॉकलेटचं जास्त प्रमाणात सेवन करू नका. डार्क चॉकलेटमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखे इतर पोषक घटकही यामध्ये आढळतात.
चिया सीड्स
चिया सीड्स देखील शाकाहारी लोकांसाठी फॅट बर्न करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन, लोह आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक असतात. चिया सीड्सदेखील ओमेगा-3 फॅटी अॅसिड आडळते. चिया सीड्सचं सेवन केल्याने टाईप-2 मधुमेह आणि हाय बीपी यांसारख्या आजारांपासून संरक्षण होते.
मासांहारींसाठी काही हेल्दी ऑप्शन्स
अंडी
अंड्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण फार असतं. तुम्हाला जर अंड्यांमधून जास्तीत जास्त प्रोटीन हवे असतील तर सर्वात सोपा उपाय म्हणजे अंडी उकळवून खा. यामध्ये व्हिटॅमिन डी देखील तुम्हाला मिळेल. तसेच, अंडी उकळवून खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.
फॅटी फिश
माशांमध्ये हेल्दी फॅट आडळते. या व्यतिरिक्त फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 एॅसिड देखील आढळते. हे आपल्या हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फार गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.