Health Tips : वाढत्या वयानुसार अनेक आजारांना सामोरे जावे लागते. परंतु, यातील सर्वात सामान्य आजार म्हणजे हाडांचे दुखणे. पण, आजकाल तरुणांनाही हाडांच्या दुखण्याला आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला जर तंदुरूस्त आणि फिट राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश केला पाहिजे. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते जाणून घ्या.
हाडांची विशेष काळजी घ्या जेणेकरून हाडं नेहमी मजबूत राहतील
तुमची हाडे किती मजबूत असतील हे तुमची दिनचर्या कशी आहे यावर अवलंबून आहे. रोजचा आहार, झोप आणि व्यायाम कसा आहे, आरोग्य चांगले असेल तर मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.
मजबूत हाडांसाठी हे पदार्थ आवश्यक खा -
- बदाम
- मासे
- ऑलिव तेल
- हिरव्या पालेभाज्या
- दही
- केळं
- तीळ
- सोया
तज्ञ म्हणतात की, तृणधान्ये कॅल्शियमचा समृद्ध स्त्रोत नाहीत कारण धान्यांमध्ये फायटिक ऍसिड असते. त्यामुळे कॅल्शियमची गुणवत्ता कमी होते. भरपूर प्राणी प्रथिने असलेले अन्न आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी करते. खाण्यासाठी तयार अन्नामध्ये जास्त मीठ आढळते आणि ते शरीरातून कॅल्शियम काढून टाकते. सोडियमचे प्रमाण संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- महिलांनो, चाळीशीतही आजारांपासून दूर राहायचंय? मग, 'या' गोष्टींचा आहारात जरूर समावेश करा!
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
- Health : 'या' आयुर्वेदिक औषधी करतील शारीरिक दुर्बलेवर मात, अनेक रोगांवर प्रभावी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha